कणकवली-प्रतिनिधी
मुंबई-गोवा चौपदरीकरणाच काम सुरू आहे. सध्या महामार्गावर दुचाकीवरून व चालत प्रवास करणे अत्यंत
धोकादायक बनले आहे़. मार्गाचे काम चालू असताना धुळीमुळे अनेक आरोग्याच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे.खड्डेमय रस्त्यात आतापर्यंत २५० लोकांचा अपघाती मृत्यू व ५०० लोक जायबंदी झाले आहेत़ त्याला जबाबदार सत्ताधारी, पालकमंत्री आणि खासदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला़
कणकवली मनसे संपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर उपस्थित होते़
आरोग्याच्या प्रश्नावर दयनिय अवस्था झालेली आहे़ पर्ससीन आणि पारंपारीक मच्छिमारांच्या प्रश्नाबाबत खासदारांनी भूमिका संशयास्पद राहिली़ अनेकदा मच्छिमारांना खासदारांनी आश्वासने देऊन फसवणूक करण्याचे काम मच्छिमारांचे केले आहे़ सोनुर्लीतील महामार्ग ठेकेदाराच्या के्रशरवर हे खासदार गेले होते़ त्या के्रेशरपासून होणारा त्रास नागरिकांनी दाखवून दिला़ अवघ्या चार दिवसात क्रशर बंद पाडू असे आश्वासन स्थानिकांना दिले होते़ ती केवळ भुरटीच ठरली आहेत़
लोकसभा निवडणुक आल्यानंतर खा़ विनायक राऊत पुन्हा आश्वासनांची खैरात करू लागले आहेत़ गेल्या पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत विनायक राऊत यांनी दिलेली आश्वासने केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना किती पुर्तता केली़ त्याची विचारणा जनतेने केली पाहिजे़ जनतेच्या प्रश्नाकडे खासदारांनी लक्ष दिले नाही़ मोबाईल टॉवरची अनेक भूमिपूजने करून विनायक राऊत यांनी श्रेय लाटले़ खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील बीएसएनएलची लॅण्डलाईन सेवा कोलमडली आहे़ त्याला खºया अर्थाने श्रेय लाटणारे राऊतच जबाबदार आहेत़ एका बैठकीमध्ये बीएसएनएलची सुविधा न सुधारल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा खासदारांनी दिला होता़ हा इशारा जनतेला दिशाभूल करणार ठरल्याचे परशुराम उपरकर यांनी सांगितले़
त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जनतेने खासदार निवडताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावणारा निवडावा़ केवळ दिखाऊपणा करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या लोकांना जनतेने नाकारले पाहिजे, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले़.
दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांना जनतेने नाकारले पाहिजे : उपरकर
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































