युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयकपदी अभिषेक अवचार यांची एकमताने निवड

551

काँग्रेसच्या युवक धोरण व संशोधन समितीची धुरा अभिषेक अवचार यांच्या हाती

जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या युवक धोरण व संशोधन समितीच्या राष्ट्रीय समन्वयकपदी महाराष्ट्र राज्यातून अभिषेक वसंतराव अवचार यांची नुकतीच निवड करण्यात आली असून युवक काँग्रेसचे केंद्रीय प्रभारी कृष्णा अल्लूवरू व राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांच्या वतीने संशोधन समितीचे अध्यक्ष विकास यादव यांनी अभिषेक अवचार यांची राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी व प्रियंका गांधींच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील लोकसभा व विधानसभा मतदारसंघाच्या विश्लेषणाची तसेच विद्यापीठ स्तरावरील युवक धोरण तयार करण्याची जबाबदारी अभिषेक अवचार यांचेवर सोपवण्यात आली आहे.

अभिषेक अवचार  हे उत्कृष्ठ कवी  व शायर असून त्यांचे साहित्य मराठी व हिंदी भाषेत प्रकाशित झाले आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर, गांधी व नेहरु विचारांचे आवचार पाईक असल्याने काँग्रेसी विचारधारा तळागाळात रुजवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. अवचार यांनी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निवडणुक प्रचाराची धुरा सुध्दा यशस्वीपणे सांभाळली होती . ते सध्या भारत – तिबेट मैत्री संघाचे राष्ट्रीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. उत्कृष्ठ वक्ते असलेले अभिषेक यांची युवा राष्ट्रकवी म्हणून देशभर त्यांची ओळख आहे.

राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाचे युवक धोरण व संशोधन समितीच्या समन्वयकपदी निवड होणे ही माझ्यासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे . सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांची जनजागृती करून ही सांस्कृतिक चळवळ जनमानसात रुजवण्याकरिता देशभरात कार्यरत राहणार आहे . तसेच गौतम बुद्ध, महावीर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरूंचे विचार युवकांनी स्वीकारून भारत देशाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या राहुल गांधी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु. अशा भावना अभिषेक अवचार यांनी निवड झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.