वाकड प्रतिनिधी – पिंपरी -चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधील कस्पटे वस्ती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कस्पटे यांनी आज प्रचार दौरा केला. या दौऱ्याला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कस्पटे वस्तीमधूनच उभ्या राहिलेल्या आणि याच परिसरातील महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या सौ. सारिका कस्पटे यांचे नागरिकांनी आपुलकीने स्वागत केले. घराघरांत जाऊन संवाद साधताना नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले. “आमच्या वस्तीतील लेक आता नगरसेवक व्हावी,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
दीर्घकाळ सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सौ. सारिका कस्पटे यांची लोकप्रियता या प्रचारादरम्यान स्पष्टपणे दिसून आली. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत विकासासाठी ठाम पाठिंबा दर्शविला.
प्रचारादरम्यान परिसरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. “सतत लोकांमध्ये राहून काम करणारे, प्रश्न समजून घेणारे नेतृत्व हवे आहे,” अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाखाली निवडणूक लढवत असलेल्या सौ. सारिका गणेश कस्पटे यांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.











































