रामकुमार शेडगे – चित्रपट लेखक – दिग्दर्शक –
“हिमालय पुत्र” बनून त्याने “ताल” धरत. “हलचल” करत त्याने “हंगामा” केला. मात्र “दिल चाहता है” म्हणत ऐतराज करत त्याने अभियाची “बॉर्डर” ओलांडली. “गांधी इस माय फादर” तो कधी म्हणाला मात्र दृश्यम च्या दूरदृष्टीने त्याने “हमराज” म्हणत तो बोलला आ अब लोट चले, “दीवार” बनून त्याने “नकाब” हटवत तो म्हणाला “मेरे बाप पेहले आप” मात्र “रेस” व शॉर्ट कट न काढता त्याने “नो प्रॉब्लेम” म्हणत. “गली गली चोर है” नारा दिला. वडिलांचा आणि “मॉम” आशीर्वाद घेत कितीही “तीस मार खान” लोक असले तरी असले तरी त्याने “सब कुशल मंगल म्हणत” अभिनयाचा अविरत प्रवास सुरू ठेवला. “डोली सजा के रखना” म्हणाला मात्र लग्नाच्या बंधनात तो अडकला नाही. त्यामुळेच तो एकटा राहुल “छावा” बनून चित्रपटसृष्टीत गर्जत राहिला. तो म्हणजे अक्षय खन्ना म्हणून म्हणावेसे वाटत दिलं चाहता है तुम्हे अक्षय…
गेल्या तीन दशकांपासून अक्षय खन्ना नावाचं वादळ चित्रपटसृष्टीमध्ये घोंगावत असून या वादळाने अनेक चित्रपटांना त्याच्या आवाक्यात घेतले आहे. मुळात अक्षय नावाचा अर्थच अविनाशी, शाश्वत, अमर असा होतो. नावाप्रमाणेच तो आहे. अक्षय खन्ना हा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असून अफाट प्रतिभा आणि एक प्रसिद्ध स्टारकिड असूनही, या अभिनेत्याला इंडस्ट्रीत हवं तसं यश मिळू शकलं नाही ? वयाच्या ४९ वर्षीचा असलेल्या अक्षय खन्नाची एकूण संपत्ती १४८ कोटी इतकी आहे. अक्षय खन्ना श्रीमंत अभिनेत्यापैकी एक असून कोणत्याही वादाच्या भोवऱ्यात न अडकलेला हा गुणी अभिनेता नुकताच प्रसिद्ध झालेल्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने तो सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अक्षय खन्नाने १९९७ मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी केली होती. जरी ‘हिमालय पुत्र’ बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी दाखवू शकला नसला तरी या चित्रपटाने इंडस्ट्रीचे दरवाजे अक्षयसाठी खुले केले होते. अक्षय खन्नाला इंडस्ट्रीत खरी ओळख ‘बॉर्डर’ या चित्रपटातून मिळाली. विशेष म्हणजे मल्टिस्टारर चित्रपट असूनही अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटासाठी अक्षय खन्नाला
बॉर्डरसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.त्याचं बरोबर दिल चाहता है या चित्रपटाध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून त्याला फिल्मफेअर मिळाले होते. शिवाय ‘हमराज’ चित्रपटात अक्षय खन्ना नकारात्मक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातही अभिनेत्याने आपल्या अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली होती. मुख्य भूमिकेत दिसलेल्या बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेपेक्षाही अक्षय खन्नाचं पात्र अधिकभाव खाऊन गेलं होतं. अक्षय खन्नाने आजपर्यंत लग्न केलेलं नाही. एके काळची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर सोबत त्याचे लग्न ठरले होते. मात्र काही कारणास्तव तो विवाहबंधनात अडकला नाही.
विनोदी, गंभीर किंवा ऍक्शन भूमिका कोणतीही असो ती भूमिका अक्षय खन्ना जगला व त्याने रुपेरी पडद्यावर त्या भूमिका मोठ्या ताकतीने त्यांने लीलया पार पाडल्या. तीस मार खान, हंगामा चित्रपट त्यांने साकारलेल्या विनोदी भूमिकांनी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर ताल, आ अब लोट चले, हलचल चित्रपटातील त्यांच्या प्रियकराच्या भूमिकांनी कित्येक तरुणांना खऱ्या प्रेमाची परिभाषा त्याने सांगितली. त्याचा २००१ मध्ये आलेला दिल चाहता है हा चित्रपट खऱ्या अर्थाने मास्टरपीस होता. शारीरिक प्रेमापेक्षा व्यक्तीप्रेम, त्या व्यक्तीच्या कलागुणांवर निखळ प्रेम कसं करायचं यात तो सांगून गेला.
बार्डरमधील निरागस, जगाशी अनभिज्ञ आणि देशावर अतुट प्रेम करणाऱ्या सच्चा सैनिकाची त्याने साकारलेली भूमिका प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. अशा त्याने अनेक चित्रपटात साकारलेल्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या. नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा चित्रपटात त्याने साकारलेला क्रूरकर्मा औरंगजेब अंगावर काटे आणतो. अतिशय कमी संवाद, मितभाषी आणि मोजकेच बोलणारे औरंगजेबाचे पात्र त्याने मोठ्या ताकतीने साकारले आहे. खराखुरा औरंगजेब त्याने साकारलेल्याने हे त्याचे पात्र जिवंत झाले असून एवढ्या मोठ्या ताकदीचा अभिनेता पुन्हा एकदा छावा चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य करायला लागला आहे.
मोजकेच चित्रपट करणारा, प्रसिद्धी, चित्रपटांची झगमगती दुनियेपासून लांब व एकांतात जीवन जगणारा हा अभिनेता सध्या अलिबागमध्ये कित्येक वर्षांपासून वास्तव करतोय. या बहुगुणी अभिनेत्याचे उत्तरोत्तर दर्जेदार चित्रपट मायबाप रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतील हीच अपेक्षा मी करेन. राहून राहून का कुणास ठाउक मला नेहमी वाटत. झाले बहु होतिल बहु परी तू तुझ्या सारखा.. अक्षय खन्ना या अभिनेत्याने भविष्य काळात उत्तमोत्तम चित्रपट करावेत. अक्षयला भेटलेल्या या अभिनयाच्या कलेच्या वर्धानाला त्याने अमर करावं.
रामकुमार शेडगे – चित्रपट लेखक – दिग्दर्शक











































