जनसंपर्क न्यूज – गडचिरोली : – गडचिरोली येेेथे नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गडचिरोली येथील कुरखेडा तालुक्यातील पुराडा मार्गावर ही घटना घडली आहे.  राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे डांबर, प्लॉंट व ३६ हून अधिक गाड्या जाळल्यांची घटना आज पहाटे असताना घडल्यानंतर त्या ठिकाणी शिवखेडा पोलीस स्टेशन येथून क्यूक रिस्पॉन्स टीमचे (QRT)कमांडो जात असलेली गाडी आय. डी बॉम्बस्फोट करुन उडवून लावल्याची घटना घडली आहे.  या घटनेत १५ हून अधिक जवान शहीद झाले आहेत अशी माहिती हाती येत आहे.