समाजातील सर्व स्थरातून बालगोपाळांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
दुष्काळाच्या राक्षसावर मात करण्यासाठी हणबरवाडी ( मसूर ) येथील सिद्धनाथ शेडगे या जिद्दी तरुणाने व बाल गोपाळांनी हाताचे पोलाद करून आणि छातीची ढाल करून दुष्काळाच्या राक्षसावर मात करण्याचा भीम पराक्रम केला आहे. गावाबाहेरील पश्चिमेला असलेल्या थारोबाच्या डोंगराच्या पठारावर हजारे लिटर पाणी साठवणाऱ्या मृत तळ्याला नवसंजीवनी दिली आहे.

हजारो लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेले थारोबाच्या डोंगरावरील तळे अनेक वर्षापूर्वीसून मृत स्वरुपात होते. पहिल्या काळात या तळ्यावर वन्य प्राणी, पशु, पक्षी यांचे वास्तव असे त्याच बरोबर गावातील मेंढपाळ, गुरेढोरे व माणसांची तहान हे तळे भागवत असे. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक वर्षापासून हे तळे मृत होते. इतिहासात हरवून गेलेल्या या तळ्याला पुन्हा एकदा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी सिद्धनाथ शेडगे या तरुणाने गावातील बालगोपाळांना एकत्र करून या तळ्याला नवसंजीवणी दिली. सिद्धनाथ शेडगे हा तरून पैलवान असून तो सातारा पोलिसमध्ये कार्यरत आहे. या कार्य सिद्धीसाठी अक्षय शेडगे या तरुणाची त्याला मोलाची साथ मिळाली.

या समाज कार्यासाठी चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धनाथ शेडगे, अक्षय शेडगे यांच्या सह शिवशंभो तालीम हणबरवाडीचे बालगोपाळ यशराज दबडे, साहिल शेडगे, सुशांत शेडगे, शंभूराज शेडगे, प्रणय साळुंखे, आदित्य पवार, देवराज शेडगे, सुजल शेडगे, नैतिक शेडगे, विजय शेडगे, सिद्धेश शेडगे, विशाल पवार, रविराज शेडगे, सिद्धार्थ शिंदे, आयुष पंदुगडे, अक्षय निगडे, शिवराज लोहार, शुभम ढेरे, विशाल घाडगे, रामकुमार शेडगे आदींनी श्रमदान केले.
पाणी आडवून जिरवणे काळजी गरज – दिग्दर्शक – रामकुमार शेडगे
सध्या देशासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळ असून पाणी प्रश्न हा बिकट बनत चालला आहे. भूगर्भातच पाणी नसल्याने विहिरी, तळी, नद्या हे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडले आहेत. पाणी संकटावर मात करायची असेलतर पाऊसाचे पाणी वाहून जावून न देता ते आडवून जिरवले तरच भूगर्भात पाणीसाठा वाढेल आणि यातूनच पाणी संकटावर मात करता येईल. म्हणून प्रत्येकाने पाणी आडवून जिरवले पाहिजे. आणि येत्या पावसाळ्यात ‘एक व्यक्ती एक झाड’ ही संकल्पना अमलात आणली पाहिजे.











































