जनसंपर्क न्यूज – इंदापूर येथील ग्रीन वूड क्रिएशन मार्फत नवोदित फोटोग्राफर आणि हौशी फोटोग्राफरांसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून येत्या जुलै महिन्यात केशर टॉकीज इंदापूर येथे पहिल्यांदा नॅशनल फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आता पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यातील फोटोग्राफरांनी सहभाग नोंदवला आहे. अशी माहिती फेस्टिवलचे दिग्दर्शक व आयोजक सोमनाथ जगताप यांनी दिली.
यात सहभागी होणाऱ्या स्पर्धत विविध गटांतून २५,००० रूपयांची पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. तरी या स्पर्धाच्या माध्यमातून शहरी फोटोग्राफर प्रमाणे ग्रामीण भागांतील फोटोग्राफरांनी काढलेले सुंदर फोटो आपल्याला पहायला मिळतील आणि यातूनच आपल्याला नवीन उत्तम फोटोग्राफर मिळतील.
त्यासाठीच आम्ही यावर्षी इंदापूर नॅशनल फोटोग्राफी स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे इंदापूर शहराचे नाव स्पर्धाच्या माध्यमातून सर्व कला क्षेत्रात उंचावण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. ३० जून पर्यंत नियमित वेळेमधील प्रवेशिका स्विकारल्या जाणार आहेत तसेच १५ जुलै पर्यंत उशीरा येणाऱ्या प्रवेशिका भरू शकता तरी अधिक माहितीसाठी www.greenwoodcreation.com या वेबसाईटला भेट द्या.











































