जनसंपर्क न्यूज – पुणे – थेट शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा या आंबा महोत्सवाचे बालगंधर्व येथे माजी नगरसेवक व स्वयंरोजगार विभाग, पुणे शहर अध्यक्ष,मनसे अनिल राणे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. बालगंधर्व येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आयोजक आरती सहाणे, रवी सहाणे, विवेक कांबळे, दत्ता माळी, भाऊसाहेब आखाडे ,हर्षल कुलकर्णी, रूपेश चांदेकर तसेच आंबा उत्पादक शेतकरी अप्पा मालवणकर (मालवण), दिलीप डामरी(कुणकेश्वर),रामचंद्र शिर्के(देवगड गिरीचे),सचिन सावंत(पाचल),श्री वानवडेकर आदि मान्यवरांच्या बरोबरच नागरिक उपस्थित होते.
येथे सुमारे २५ स्टॉल्स आहेत. आंबा शेतकरी व ग्राहक यांना एकत्र करणार्या या उपक्रमास पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून शेतकरी व महिला बचतगट यांना बाजारपेठ ही मिळत आहे. हा आंबा महोत्सव २५ एप्रिल पासून सकाळी ९ ते रात्री ९ खुला राहणार आहे.
छायाचित्र : उद्घाटन प्रसंगी अनिल राणे,आरती सहाणे,रवी सहाणे व अन्य











































