जनसंपर्क न्यूज – दि २७ :- पुणे येथे झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेले भाग म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत अंबिल ओढा, लक्ष्मीनगर पर्वतीगांव,टांगेवाला हाॅऊसिंग सोसायटी काॅलनी, सिंहगड वडगांव, किरकटवाडी, गाव येथे *पाण्याच्या प्रवाहामुळे बाधित भागांना भेट दिली त्या भागांतील नागरिकांशी समस्या आहे. काही भागांत पुर परिस्थिती मुळे घरे बाधित आहे ,त्या भागात पिण्याचा पाण्याचा सोय नाही आणि घर स्वच्छ करण्यासाठी पाणी नाही तिथे महानगरपालिकेचे स्थानिक अधिकांऱ्याशी बोलून तात्काळ पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून देण्यात यावे.*
भागात पुराचे पाणी शिरल्यामुळे काही नागरीकांची घरे व घरातील साहित्य पुर्णत: वाहून गेले आहे. त्यामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तरी त्यांची तात्पुरती राहण्याची सोय करण्यात संबधित अधिकार्ऱ्यांना सुचना देण्यास आल्या. *पुणे शहरातील पंचनामे लवकरात लवकर दि .२८ तारखेपर्यंत व्हावेत अश्या सुचना दिलेल्या आहेत. आणी दि.२९ व ३० तारखेपर्यंत लवकरात लवकर नुकसान भरपाई करण्यात यावी अश्याप्रकारच्या अपेक्षा आहे*
ज्या घरातील लोक दगावले आहे खरेतर त्यांना मदत ४८ तासात मदत मिळायला पाहिजे परंतु निवडणुक आयोगाची अडचण असेल निवडणुक आयोगाच्या परवागीने लवकरात लवकर मदत मिळू शकेल असे सुचविले.
*घरांच्या योजना प्रलबिंत राहिलेला आहे त्यांचे स्वत: अर्ज करून द्यावे आचारसंहितेनंतर बिल्डर कडून व नागरिकांकडून दिरंगाई होत असेल या विषयी बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्यात येईल याबद्दल मा. मुख्यमंत्री,पालकमंत्री यांचे कडे पाठपुरावा करुन विभागीय आयुक्तांना ना.डॉ. नीलम गोर्हे तशा सुचना देणार आहेत *त्यातील गरीब लोकांच्या घरांची परिस्थिती गंभीर आहे. बेकायदेशीरपणे भिंती बांधल्या गेल्या ,अतिक्रमणे केली आहेत त्या संदर्भात सरकारने एक व्यवस्थीत अहवाल पुढच्या तीन महिण्यात सादर करावा जे काही अयोग्य बांधकाम आहे सरकारनी व नगर विकासाने याबद्दल योग्य ती भूमिका घेतली पाहिजेत असे मत मांडले
किरकटवाडी विशेष : ईमारतींच्या कोंडीत सापडलेल्या गरीब वसाहतील नागरिकांचा वहिवाटीला सोसायटींना रस्ता बंद केल्याने पाण्यातुन अनेक नागरिक कोंडीत सापडले होते.या सर्वांची घरे पुर्णत: वाहुन गेली आहेत .त्यात स्वत:पाठपुरावा करण्याची ग्वाही सरपंच गोकुळ करंजावणे यांना दिली .तसेच पोलीस,प्रशासन यांनी या गावकर्यांना घरे देण्याचा प्रस्ताव शासन नक्कीच प्रत्यक्षात आणेल परंतु वहिवाटीला रस्ता ऊपलब्ध करुन देण्यासाठी निर्देश प्रशासनास त्वरित देणार असल्याचे सांगितले
पुण्यात पुरपरिस्थितीच्या नुकसानीवर मात करण्यास ना.नीलम गोर्हे यांच्या संवेदनशील पाहणीला महिलांचा व नागरिकांचा भरभरून प्रतिसाद
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































