अजितदादा पवार यांचा आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा राज्यात प्रचंड खळबळ

521

मुंबई :  जनसंपर्क न्यूज – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनमा दिला. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला असून अध्यक्षांनी तो स्विकारला आहे.

पवारांनी नेमका कोणत्या कारणामुळं राजीनामा दिला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूका येऊन ठेपल्या असताना अजित पवारांनी कशासाठी राजीनामा दिला याबद्दल तर्क वितर्क काढले जात आहेत. शरद पवार आज मुंबईत ईडीच्या कार्यालयात जाणार होते. मात्र, मुंबईच्या पोलिस आयुक्‍तांनी त्यांना सरकारतर्फे विनंती केल्यानंतर शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचं रद्द केलं.