जनसंपर्क न्यूज – पुणे शहरातील मध्यवस्ती भागात आंबिल ओढा काँलनी साने गुरूजी नगर मनपा वसाहत येथे गेली ५० वर्षापासुन आधिक काळ चतुर्थ श्रेणीतील घाण भत्ता कर्मचारी वास्तव्यास असुन, मागील अनेक वर्षांपासुन येथील कर्मचारी पुणे मनपा मध्ये सेवा करत असताना, गेली ५० वर्षांपासुन आधिक काळ सदनिकाचे भाडे देखील भरत आहेत. स्थानिक रहिवासी गेली २५ वर्षापासून आधिक काळ या ठिकाणी राहत असलेल्या सदनिका नावावर करुन द्याव्यात अशी मागणी करत आहे.
असे असताना पुणे महानगरपालिकेने सभागृहात स्थानिक रहिवासी, कर्मचारी यांची मते विचारात न घेता, याठीकाणी बीओटी करार मंजुर केला असुन, हा करार स्थानिकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये काही बिल्डर व राजकारणी मंडळी चे हितसंबंध लपले असण्याची शक्यता आहे.
हा बीओटी करार स्थानिकांवर लादण्यासाठी मनपा अधिकारी कडुन काल दि. ८ जुलै रोजी वसाहतमधील चाळ क्र १० च्या स्लॕबचा थोडासा तुकडा पडला असताना संपुर्ण चाळच केव्हाही पडणार असल्याच्या अफवा पसरवुन, अशा बातम्या पेपर मध्ये छापुन आणल्या जात आहे. तसेच याठिकाणी पोलीस बळाचा वापर करुन सदनिका खाली करणार असल्याच्या नोटिसा पुणे मनपा कडुन रहिवाश्यांना पाठवल्या जात आहे.
या विरोधात आज मंगळवार दि. ९ जुलै रोजी साने गुरुजी नगर वसाहत बचाव कृती समिती च्या वतीने स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत पुणे मनपा बिल्डिंग ला जाऊन निदर्शने केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला, युवक, व ज्येष्ठ रहीवासी देखील उपस्थित होते. यावेळी महापालिका आयुक्त मा. सौरभ राव, तसेच महापौर मा. मुक्ताताई टिळक यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सर्व स्थानिक रहीवाशांनी आयुक्त सौरभ राव व महापौर मुक्ताताई टिळक यांना राहत असलेल्या सदनिका ह्या राहण्यास धोकादायक नसुन सध्या तरी सुस्थितीत आहे हे पटवुन देण्यात आले.
तसेच याठिकाणी प्राथमिक स्वरुपाची डागडुजी करुन, नविन बांधकाम करण्यापुर्वी स्थानिकांना त्याच ठिकाणी तात्पुरता स्वरुपात राहण्याची सोय करुन देण्यात यावी. तसेच ज्या आधारावर सांयतारा व ओम शांती सोसायटी बांधुन नावावर करुन देण्यात आल्या. त्याच आधारावर या ठिकाणी देखील नविन सदनिका बांधुन कर्मचाऱ्यांना मालकी हक्काच्या करुन देण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली.
यानंतर स्थानिकांच्या वतीने पत्रकार परीषद घेऊन मनपा आधिकारी कशा पद्धतीने स्थानिकांच्या माथी बीओटी करार लादण्यासाठी दिशाभुल करुन स्थानिकांवर आन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे याची माहीती देण्यात आली. यावेळी स्थानिक रहीवासी मा. गणेश सातपुते, मा. वामनराव क्षीरसागर, मा. धनंजय जाधव, मा. दिलीप शेडगे, मा. श्याम ढावरे, मा. महेश महाले, मा.आशालता कुलकर्णी, मा. शोभाताई कांबळे, मा.राकेश क्षीरसागर, मा.प्रमोद करडे, मा. शेखर बाळे व ईतर सर्व प्रमुख स्थानिक रहीवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































