जनसंपर्क न्यूज – आजींना महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी मॅच विनर असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी या आजींना एक खास ऑफरही दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी या आजी भारताचा सामना बघायला जाणार असतील तर त्यांच्या तिकीटांचा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. आनंद महिंद्रा हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. अनेकदा ते ट्विटवरुन क्रिकेटसंदर्भातील ट्विट करत असतात.

दरम्यान, दोन्ही गालांवर भारताचा झेंडा रंगवून पिपाणी वाजवणाऱ्या या आजींचं नाव चारूलता पटेल असे आहे. या आजींची झकल टिव्हीवर दाखवल्यानंतर काही क्षणांमध्ये ट्विटवर त्यांचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.