जनसंपर्क न्यूज – पुणे : आज जलसंधारण मंञी तानाजी सावंत यांच्या घरी खेकड्यांनी धुमाकूळ घातला व त्यांचे निवासस्थान फोडण्याचा प्रयत्न करत असताना आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हि माहिती मिळताच आम्ही सर्वांनी जलसंधारण मंञी तानाजी सावंत यांच्या घरी धाव घेतली. या खेकड्यांना पकडुन भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन ला पोलिस निरीक्षकाच्या ताब्यात दिलेत अशी माहिती रुपाली ताई चाकणकर यांनी दिली.
तिवरे धरण फोडल्यानंतर हे खेकडे मंञ्यांचे घर देखील फोडु लागलेत,त्यामुळे तातडीने या खेकड्यांवर 302चा गुन्हा दाखल करावा. अन्यथा उद्या अजुन काही दुर्घटना घडू शकतील.आज खेकड्यांच्या घर पोखरण्यामुळे तानाजी सावंत व त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवाला धोका होता पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्तांच्या सतर्कतेमुळेच आज त्यांचे जीव वाचले. असे रुपाली ताई चाकणकर यांनी सांगितले.








































