मालवण-प्रतिनिधी
जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी रविकिरण स्मरणिकेचे प्रकाशन झाले. तसेच राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगताप, जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर उपस्थित होते. यावेळी जगताप यांनी माणसाजवळ आत्मविश्वास असेल तर माणूस यशाचे शिखर गाठू शकतो असे सांगितले. जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे संत रविदास समाजभूषण पुरस्कारांचे मानकरी नामदेव जाधव (कणकवली) बाळकृष्ण माणगावकर (मालवण), मधुकर जाधव (कुडाळ), पी.बी. चव्हाण (सावंतवाडी), विनोद पवार (देवगड), ज्ञानेश्वर तळकटकर (दोडामार्ग), उत्तम चव्हाण (वेंगुर्ले) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष ऍड. अनिल निावडेकर, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश चव्हाण, जिल्हा सरचिटणीस सुयोग धामापूरकर, पं. स. सदस्य अजिंक्य पाताडे, बाबुराव चव्हाण, छोटू कदम, प्रसाद मसुरकर, कोषाध्यक्ष विजय चव्हाण, मालवण तालुकाध्यक्ष विद्याधर पवार, सचिव मनोहर मालंडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष दिलीप इन्सुलकर, सचिव जगदीश चव्हाण, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र चव्हाण सचिव अनंत जाधव, देवगड तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण, सचिव प्रशांत मोंडकर, कुडाळ तालुकाध्यक्ष रामदास चव्हाण, सचिव सुभाष बांबूळकर, लवेंद्र किंजवडेकर, माजी सचिव श्रीराम चव्हाण, राजन वालावलकर, वसंत चव्हाण, रामचंद्र चव्हाण, चंद्रकांत पाताडे, सुधाकर माणगावकर, हेमांतकुमार पाताडे, भारत बांदेकर, सुधाकर बांदेकर, बाळकृष्ण नांदोसकर, चंद्रसेन पाताडे, दीपक बांदेकर, कल्याण कदम, गणेश म्हापणकर, प्रभाकर नांदोसकर, सुरेश पवार, अस्मिता कुणकवळेकर, गुंडू चव्हाण, राजन कुडाळकर, नितीन बांबोर्डकर, साधना चव्हाण, मंगेश होडावडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोहर सरमळकर यांनी केले. प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस सुयोग धामापूरकर यांनी केले.











































