जनसंपर्क न्यूज – विक्रम गोखले अॅक्टिंग अकॅडमीच्या वतीने अभिनय कार्यशाळेबाबत चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन श्री गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी नुकतेच कऱण्यात आले होते. या प्रसंगी जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले, अभिनेत्री वर्षा उसगावकर, गिरीश परदेशी, मेघराजराजे भोसले व एच. आर. झूम फिल्मचे राजाराम कोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
या प्रसंगी जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विक्रम गोखले बोलताना म्हणाले, की “अभिनय म्हणजे आभास निर्मितीची कला असून अभिनय एवढा खोटा करायचा की तो खरा वाटला पाहिजे.” ते पुढे म्हणाले की ‘नकळत सारे घडले’ व ‘बॅरिस्टर’ हे नाटके करताना मला खूप मोठी आवाहने आली होती. मात्र रंगमंच असो या चित्रपट स्वतःला झोकून देवून काम करणं म्हत्वाचे आहे. नवोदितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, या क्षेत्रात येताना स्वतःचा स्वतःवर विश्वास असे फार महत्त्वाचे आहे. अभिनयातील बारकावे व छोट्या छोट्या गोष्टी शिकणे गरजेचं असते.
अभिनेत्री वर्षा उसगावकर या वेळी म्हणाल्या की एक उत्तम अभिनेत्री बनायचं असेल तर मुळात उपजत त्या व्यक्तीमध्ये काही गुण असणे आवश्यक असते. महिलांसाठी चित्रपटसृष्टीत वातावरण अनुकुल आहे. त्याच बरोबर सुरक्षित आहे. मात्र मुलींनी ज्या वेळी या क्षेत्रात येताना स्वतःची काळजी स्वतः घ्याला हवी. खबरदारी म्हणून तुमच्या सोबत आपल्या पालकांना अथवा जवळच्या व्यक्तीला सोबत असती तर फारच उत्तम गोष्ट आहे.
अभिनेते गिरीश परदेशी बोलताना म्हणाले की, “या सुखानो” ही टीव्ही मालिका करताना मला विक्रम गोखले यांची खूप मदत झाली.व्यवसायिक अभिनेता बनण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. अभिनया बरोबरच विक्रम गोखले हे उत्तम व्यक्ति आहेत. त्याच बरोबर ते चालत बोलत विद्यापीठ आहेत. त्यांच्या सानिध्यात राहील तरी खूप गोष्टी शिकायला मिळतात. याच शिवाय चित्रपट महामंडळाला त्यांची वारंवार मदत आहे असे मेघराजराजे भोसले यांनी सांगितले.
या कार्यशाळेला पुणे व पुणे परिसरातील नवोदित कलाकारांनी उदंड प्रतिसाद दिला. तर या कार्यशाळेचे व परिसंवादाचे सूत्रसंचालन मिलिंद शिंत्रे यांनी केले होते.











































