एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी

395

जनसंपर्क न्यूज – एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे व विश्‍वशांती केंद्र(आळंदी) माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माईर्स एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर, एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्रोव्होस्ट डॉ. श्रीहरी होणवाड ,प्रोव्होस्ट डॉ. रवी चिटणीस ,एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. डी. पी. आपटे, माईर्स एमआयटीचे उपकुलसचिव श्री. अभय बिरारी, डॉ. प्रसाद खांडेकर ,प्रा .डॉ. बी . एम . कुचेकर ,प्रा .हिवाळे व विद्यार्थी जगन्नाथ वणवे हे उपस्थित होते.
प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील म्हणाले,“ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची देशात व जगात पूजा केली जात आहे. त्यांनी समाजाला दिलेला विचार आचरणात आणला पाहिजे. खरे म्हणजे पूजा ही विचारांची करावी. जात-पात विसरुन कार्य केल्यास समाजाची उन्नती होईल. ”
प्रा. दीपक आपटे म्हणाले,“ घटनेवर श्रद्धा ठेऊन त्याचे पालन करावे. उल्लंघन करु नये. तन, मन व धनाने अभ्यास करावा. तेच खरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल.”
जगन्नाथ वणवे म्हणाला,“ डॉ. बाबासाहेबांचे विचार आचरणात आणल्यास समाजाचा व देशाचा सर्वांगीण विकास होईल. चांगल्या विचारातूनच समाजाची उन्नती होते.”
या प्रसंगी डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले.
माईर्स एमआयटीच्या विद्यार्थ्यांनी व कर्मचार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.