भीषण पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करावी – डॉ. नीलम गोरे

405

जनसंपर्क न्यूज – पुणे (16 एप्रिल) –  राज्यात पावसाअभावी खरीपासोबतच रबी हंगाम हातातून गेला . प्रकल्पही कोरडे पडले . त्यामुळे आता भीषण पाणी टंचाईचे संकट असल्याचे दि . १४ एप्रिल , २०१९ च्या सुमारास समोर आले आहे . पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ मराठवाड्यातील जनतेवर आली . आता उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे जवळपास सर्वच स्रोत कोरडेठाक पडले आहेत . त्यामुळे गावागावांतून प्रशासनाकडे टॅकर सुरू करण्याचे प्रस्ताव येत आहेत . दररोज नवनवे प्रस्ताव येत असल्याने मराठवाड्यात आठवड्यात जवळपास २५० प्रस्तावाची भर पडत आहे मात्र त्या तुलनेत मंजूरीला वेग येत नाही . लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर दुष्काळी भागाच्या गरजा लक्षात घेऊन राज्य शासनाने सर्व उपाययोजना केल्याचे सांगितले . परंतू गरजेनुसार टेंकर , अधिग्रहणाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर होताना दिसत नाहीत . खरे तर ग्रामीण भागात गावोगावी टॅकर सुरू करून पाणी संकटाची तीव्रता कशी कमी करायला पाहिजे. मराठवाड्यातील औरंगाबाद , परभणी , नांदेड , जालना , बीड , लातूर , हिंगोली , परभणी , उस्मानाबाद , सोलापूर जिल्ह्यातील स्थिती अंत्यत भीषण आहे . त्यामुळे विभागनिहाय टॅकर औरंगाबाद मराठवाडा विभागात सर्वाधिक २ हजार १८५ टैंकर सुरू असले तरी आणखी बरेच प्रस्ताव प्रलंबित आहे . राज्यात भीषण स्थिती असून राज्यातील ३५८ पैकी १६८ तालुक्यांतील ५ हजार ६१४ गावांमध्ये जलसंकट निर्माण झाले आहे . भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार या गावातील भूजल पातळी ९ ते २ मीटरने घटली आहे टंचाई निवारणार्थ कृति आराखडा शासनाने उपाययोजना राबविणे सुरू केले आहे . परंतू निवडणुकीच्या धामधुमीत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे .राज्य शासनाने प्रसाशनाला दुष्काळीच उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे . तसेच पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन तात्काळ मागवून घ्या आणि ते मंजूर करा , असा आदेश दिला . त्यामुळे गावोगावच्या सरपंच ग्रामसेवकांनी प्रशासनाकडे टॅकरची मागणी केली परंतू तसे हातांना दिसत नाही . त्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ अनेक गावच्या ग्रामस्थांवर आली आहे . त्यातच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने पाणीटंचाईची अवस्था बिकट असल्याने या बिकट स्थितीत दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असून उपरोक्त विशद वस्तूस्थिती आपल्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे . त्यावर तातडीने विचार व्हावा व दुष्काळग्रस्त क्षेत्रातील भीषणपाणी टंचाईवर तात्काळ आदेश देऊन उपाययोजना करून मराठवाड्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी डॉ. नीलम गोरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.