जनसंपर्क न्यूज – महाराष्ट्र माझा परिवाराकडून
शहीद जवान परिवाराचा हृद्य सन्मान
– देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या मराठी सैनिकांच्या कुटुंबांचा शाल ,सन्मानचिन्हाने गौरव
देशाच्या सीमांचे रक्षण करताना आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या महाराष्ट्राच्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा हृद्य सन्मान महाराष्ट्र माझा परिवाराने प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिर मिनी सभागृहात आयोजित केला होता.शहिदांचे कुटुंबीय या आगळ्यावेगळ्या भावपूर्ण सन्मानाने सदगदित झाले होते.महाराष्ट्र माझा यु ट्यूब चॅनेल आयोजित या कौटुंबिक सोहोळ्याचे निमित्त होते वीर जवानांच्या पराक्रमांवर साकारलेल्या “फौजी” यु ट्यूब माहितीपटाच्या अनावरणाचे आणि “महाराष्ट्र्र माझा” यु ट्यूब चॅनेलच्या लोकार्पण समारंभाचे सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी निवृत्त कर्नल आर आर जाधव हे होते.त्यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
शहीद जवान कुटुंबियांच्या या गौरव सोहोळ्यात हुतात्मा स्क्वाड्रन लीडर निनाद मांडवगणे यांचे वडील वीर पिता अनिल मांडवगणे,वीर माता सुषमा मांडवगणे,हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या
आई वीरमाता अनुराधा गोरे ,हुतात्मा रवींद्र बबन धनवडे ( शौर्यचक्र ) यांचे कुटुंबीय आणि हुतात्मा गनर गुलाबराव पांडुरंग कदम यांच्या आई वीरमाता वैजन्ताबाई कदम यांचा कर्नल जाधव यांच्या हस्ते हृद्य सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात आजी माजी सैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती, या सर्वांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्र माझा चे विनोद कदम यांनी प्रास्तविक केले त्यात त्यांनी चॅनेलच्या उद्देशाबाबत बोलताना सांगितलं कि ,महाराष्ट्राला शौर्य,बालीदान आणि त्यागाची जी परंपरा आहे ती लोकांपर्यंत पोहचऊन सैनिकांच्या त्यागाचे कार्य समाजासमोर घेऊन जायचे आहे. तसेच या चॅनलने “फौजी” या माहितीपट मालिकेतून तरुणांच्या मध्ये एक प्रेरणादायी इतिहास पोहचवण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेतलं आहे. “सैनिकहो तुमच्यासाठी” ह्या विकास पवार दिग्दर्शित एकांकिकेने कार्यक्रमाची सांगता झाली
शहीद धनवडेंच्या आईचे अश्रू झाले अनावर
सत्कार प्रसंगी हुतात्मा रवींद्र बबन धनावडे यांच्या आईंना अश्रू अनावर झाले त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना शहीद कुटुंबियांचा सन्मान होत असताना संपूर्ण हॉल भरलेला पाहून सर्वांचे मनापासून आभार मानले, आणि “शौर्य चक्र”विजेते रवींद्र धनावडे मेमोरीयल फाऊंडेशन च्या “पाणी आडवा पाणी जिरवा” मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.








































