आता दिया मिर्झाचा झाला घटस्फोट

597

जनसंपर्क न्यूज ( मुंबई ) – अकरा वर्षांच्या संसारानंतर पतीपासून विभक्त झाल्याचा निर्णय तिने सोशल मीडियावर जाहीर केला आहे. विभक्त होण्याचा निर्णय आम्ही संगनमताने घेतला असल्याचेही तिने स्पष्ट केले. साहिल आणि दिया यांनी मिळून एक निर्मिती संस्थाही सुरू केली होती. ते दोघंही या व्यवसायात भागीदार होते. मात्र दियाने आणि साहिलनं एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. दियाने २००० मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.

काही दिवसापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून दिया मिर्झाची निवड करण्यात आली आहे. भारतातील ‘वाइल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ची देखील दिया ब्रँड अॅबेसिडर आहे. भारतात पर्यावरण आणि वन्य प्राण्यासांठी दिया काम करते.