जनसंपर्क न्यूज – क्षेत्रात कर्तृत्व गाजवणे हेच मानवजन्माचे उद्देश आहेत. झेंडूच्या फुलाला गुलाब होता येत नाही, पण सर्वोत्तम झेंडू होण्यासाठी प्रयत्न नक्कीच करता येतात. एक स्त्री असूनसुद्धा, असे स्त्रियांबाबत म्हणणे हेही पुरुषसत्ताक पद्धतीचेच पालन आहे. स्त्रियांच्या कर्तृत्वाला व क्षमतेला कोणत्याही मर्यादा नसतात. स्त्रियांना वैचारीक स्वातंत्र्य दिले गेले तर विश्व अधिक सुंदर होईल “असे उद्गार कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी व्यक्त केले.
करम प्रतिष्ठान व रंगतसंगत प्रतिष्ठानतर्फे आयोजित मुलाखतीत त्या बोलत होत्या. या प्रसंगी करमचे भूषण कटककर, प्रज्ञा महाजन, रंगतसंगतचे प्रमोद आडकर व मैथिली आडकर उपस्थित होते.
शिल्पा ठोकडे म्हणाल्या, मुले आणि संसार यात बांधले गेल्यामुळे स्त्री कमजोर असते हे चित्र उभे राहिलेले आहे. वास्तविक पाहता स्त्री कोणतेही आव्हान चिवटपणे पार पाडू शकते.
या प्रसंगी झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात ज्योत्स्ना चांदगुडे, अपर्णा कडसकर, वासंती वैद्य, वर्षा कुलकर्णी, वर्षा हळबे, उर्मिला वाणी, अपर्णा डोळे, वैजयंती आपटे यांचा सहभाग होता. तसेच, कार्यक्रमात पंधरा स्कूल व्हॅन चालिका महिलांचा सन्मानपत्र व सॅनिटरी नॅपकीन्स देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचा परिचय वासंती वैद्य यांनी दिला.
स्वाती सामक व प्रज्ञा महाजन यांनी प्रास्ताविक केले. अमृता साळुंखे जोशी यांनी सूत्रसंचालन केले. मुक्ता भुजबले यांनी आभार मानले.
फोटोत डावीकडून – मैथिली आडकर, प्रमोद आडकर, शिल्पा ठोकडे व भूषण कटककर











































