Oplus_0

जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – सैनिक समाज पार्टीच्या वतीने पर्यावरण, पाणी, प्रदूषण, कचरा आणि भ्रष्टाचार या समस्या सोडवणुकीचा जाहीरनामा घेऊन कर्नल  सुरेश पाटील (नि) यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी नुकताच जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्याकडे अर्ज दाखल केला.  पुणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टीच्या वतीने निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील खासदारकीची निवडणूक लढवत आहेत. पर्यावरणावर गेली तीन दशके सतत कार्यरत असणारे १९७१ च्या भारत-पाकच्या युध्दात देशासाठी शत्रुचा हल्यात जखमी झालेले होते.

देशावर जेंव्हा जेव्हा मोठी संकट आली त्यावेळी फक्त आणि फक्त भारतीय सैन्याने मदत करून भारतीय नागरीकांचा जीव वाचवला आहे. मग देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतीय निवृत्त सैनिक पण त्यामध्ये उतरूण जनतेसाठी न्याय देऊ शकतात आणि कुठल्याही पक्षाने, आर्मी मधील निवृत्त सेनानीला पुणे लोकसभेकरीता उमेदवारी दिली नाही हे दुदैव आहे म्हणून आर्मी मधील सैन्याचे प्रचंड प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत त्याला वाचा फोडण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या वतीने त्यांनी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.