वैकुंठ मेहता संस्था पुण्यात असल्याचा मला सार्थ अभिमान – मुरलीधर मोहोळ

(वैकुंठ मेहता संस्थेत पदवी प्रदान सोहळा उत्साहात)

जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – “भविष्यकाळात कृषी आणि सहकार क्षेत्रात मोठी क्रांती होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. रिकाम्या हाताला काम आणि प्रत्येकाला रोजगार मिळणार असून या क्षेत्रात मोठी क्रांती घडेल.” पुण्यातील वैकुंठ मेहता संस्थेत पदवी प्रदान सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. या प्रसंगी त्यांनी असे मत केंद्रीय राज्यमंत्री नागरिक विमान वाहतूक आणि सहकार मंत्रालय मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वैमनिकॉम) चा  पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा – कृषी व्यवसाय आणि व्यवस्थापन (२०२२ – २०२४) सालाच्या ३० व्या बॅचचा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व वैमनिकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव यांच्या शुभहस्ते दीक्षांत समारंभात २०२४ मध्ये पदवीधर झालेल्या 96 विद्यार्थ्यांना व्यवस्थापन-कृषी व्यवसाय आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका प्रदान करण्यात आली. हे (पी. जी. डी. एम – ए. बी. एम) ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (ए. आय. सी.टी ई ), भारत सरकार, ए. बी. एम आणि आय. एस. ओ प्रमाणित आहे. भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनद्वारे एम.बी. ए पदवीच्या समतुल्य प्रदान केले आहे आणि राष्ट्रीय मान्यता मंडळ, नवी दिल्ली द्वारे मान्यताप्राप्त आहे. यावेळी सहकार परिप्रेक्ष्यातील खंड ५८ विशेषांक आणि खंड ५९ अंक १ चे प्रकाशन  करण्यात आले आणि कार्यकारी किनार-सत्र मालिकेचा शुभारंभ देखील माननीय मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना मोहळ म्हणाले, या अभ्यासक्रमातून पदवीधर झालेल्या तरुणांना कृषी व्यवसाय आणि सहकार क्षेत्रात यशस्वी करिअर मिळेल. सहकार क्षेत्र हे जगातील सर्वात मोठे क्षेत्र आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. भारतात ८.५ लाखांहून अधिक सहकारी संस्था आहेत. ज्यांचे २९ कोटी सदस्य आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ आणि शाश्वत विकासासाठी सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित करण्यात सहकारी संस्था महत्त्वाची भूमिका बजावतात. हे लक्षात घेऊन आमच्या सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट आणि सक्षम करण्यासाठी माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. ग्रामीण भागाचा विकास करणे आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना सहकाराच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

डॉ. हेमा यादव म्हणाल्या कि वैमनिकॉम शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे मुलींच्या शिक्षण आणि महिला प्रशिक्षणाला प्रोत्साहन देत आहे. वैमनिकॉमने महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सरकारी संस्थांमध्ये आणि देशभराती आघाडीच्या २५ बी-स्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेनंतर भारत सरकार पीजीडीएम-एबीएमच्या प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना २ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देत आहे. कुमारी मेघना हि विद्यार्थी ३० व्या बॅचमध्ये एकूण अव्वल ठरली तिला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

यावेळी सहकार, राज्य आणि केंद्र सरकार, कॉर्पोरेट्स, एफ. पी. ओ. एफ.पी. सी. एस इत्यादींकडील मान्यवर निमंत्रित, ३० व्या बॅचचे पी. जी. डी. एम ए.बी. एम  विद्यार्थी आणि पी. जी. डी. एम ए.बी. एम माजी विद्यार्थी देखील उपस्थित होते. उपस्थित होते. डॉ. ए.के. अस्थाना, रजिस्ट्रार यांनी उपस्थित असणाऱ्यांचे आभार व्यक्त करून  पदव्युत्तर पदविका व पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचेही त्यांनी अभिनंदन केले. तर पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन संचालक डॉ. डी. रवी यांनी केले.

सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी अन्नधान्य साठवणूक

भारतातील सहकार क्षेत्रात, जुलै २०२१ मध्ये सहकार मंत्रालयाच्या स्थापनेपासून २० सहकारी क्षेत्रांमध्ये नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या हस्ते १८,000 हजार संगणकीकृत (पी. ए. सी. एस.) प्राथमिक सोसायट्यांच्या मॉडेल उपविधींच्या विकासासह औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. पंतप्रधानांनी सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी अन्नधान्य साठवणूक योजना सुरू असून ज्यामध्ये १.२५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आहे. ११ राज्यांमध्ये ११ प्राथमिक कृषी सहकारी संस्थांनी (पी. ए. सी. एस.) ११  गोदामे स्थापन केली आहेत. शिवाय, सहकारी डेटा बेस तयार करणे आणि राष्ट्रीय स्तरावर सहकारी विद्यापीठ स्थापन करणे महत्त्वाचे आहे.