जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – शाकाहार प्रेरक डॉ. कल्याण गंगवाल यांच्या शाकाहार हा आनंदी जीवनाचा आधार या पुस्तकाचे प्रकाशन आचार्य नयपद्म सागर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. डॉ. कल्याण गंगवाल यांचे शाकाहारवरील योगदान हे अमूल्य आहे. सुखी जीवनाचा आधार असलेले त्यांचे शाकाहार हे पुस्तक त्यात बहुमुखी आहे. जीतो आणि जिओचे संस्थापक आचार्य नाय पद्मसागर सूरी यांच्या मार्गदर्शनाखाली पालीताना येथे जैन व्यावसायिक परिषद नुकतीच पार पडली.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले की “शाकाहार हा सुखी जीवनाचा आधार आहे” या पुस्तकाच्या लोकार्पण सोहळा अठरा आचार्यांच्या सहवासात आणि सुमारे १०० ऋषी-मुनींच्या शुभ सहवासात पार पडला. त्यांनी शाकाहाराचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या कार्याची प्रशंसा करून मी करत असलेल्या कामांचे त्यांनी कौतुक करून सर्वांनी भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदरील पुस्तक प्रत्येकानी वाचालयाल हवे. यामध्ये शाकाहार करने आणि शाकाहारी होणे किती महत्वाचे आहे. मानवी शरीराला शाकाहारच महत्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आजकालच्या धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्य आणि निरोगी राहायचे असेल तर शाकाहार करने गरजेचे आहे.











































