कै. रणजित पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
कणकवली-प्रतिनिधी
आपल्या मित्राच्या आठवणी कायमस्वरूपी जपणं हीच खरी मैत्री आहे आणि ही मैत्री जपण्याचे काम गांगेश्वर मित्रमंडळ आणि सुजित जाधव मित्रमंडळ यांच्या वतीने केल जात आहे हे मित्रमंडळ राबवित असलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे असे प्रतिपादन अरूणभाई दुधवडकर यांनी केले.
गांगेश्वर मित्रमंडळ आणि सुजित जाधव मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित कै. रणजित पाटील स्मृती चषकाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रसिध्द उद्योजक दादा पावसकर, सुशांत नाईक, सुजित जाधव, प्रतीक्षा साटम, योगेश ताम्हणकर, संजय जगताप, सुशील डवर, अक्षय कसालकर, अनुप वारंग, सूर्यकांत जाधव, मुन्ना वाळके आदी उपस्थित होते.
गेली आठ वर्षे सातत्याने रणजित पाटील यांच्या स्मरणार्थ गांगेश्वर मित्रमंडळ व सुजित जाधव यांच्या वतीने प्रकाश झोतातील अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच प्रथम पारितोषिक ११ हजार ८ व आकर्षक चषक आणि विजयी संघाला बकरा पारितोषिक म्हणून दिल जाणार आहे. या स्पर्धेत ३० संघ सहभागी झाले आहेत.













































