सावंतवाडी,ता.१५

सावंतवाडी संस्थानला सुमारे ४०० वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे या राजघराण्याचे १९ वे वंशज युवराज लखम राजे यांचा शुभविवाह थाटात संपन्न झाला या शुभ विवाहास देशभरातील राजे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते

सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब माजी आमदार हीज हायनेस स्व. शिवरामराजे भोसले व राजमाता हर हायनेस स्व. सत्वशीलादेवी भोसले यांचे नातू युवराज लखमराजे यांचा शुभविवाह राजवाड्यात राजेशाही थाटात संपन्न झाला.

सावंतवाडी संस्थानचे अठरावे वंशज राजेसाहेब श्रीमंत खेम सावंत तथा बाळराजे भोसले व श्रीमंत सौ शुभदादेवी भोसले यांचे चिरंजीव एकोणिसावे राजे युवराज लखमराजे यांचा शुभविवाह गुजरात सौराष्ट्र येथील उद्याेजक श्री अजय व सौ जयश्री दाेडीया यांची द्वितीय कन्या ची .सौ.कां.श्रध्दा हिच्याशी थाटात संपन्न झाला या शुभविवाह देशभरातील सुमारे २०० निमंत्रित उपस्थित होते त्यातील बहुतेक राजघराण्यातील नातेवाईक हाेते. सावंतवाडी राजघराण्याचे देशभरातील राजघराण्याशी स्नेहसंबंध आहेत .

संस्थांनाचा चारशे वर्षांचा उज्ज्वल इतिहास जनतेच्या स्मरणात आहे सावंतवाडी संस्थांचे भुतपूर्व अधिपती स्व.श्रीमंत बापूसाहेब महाराज आणि त्यांचे सुपुत्र राजे माजीआमदार शिवरामराजे भोसले यांनी राजघराण्याचा कारभार लोकप्रिय केला. त्यामुळे ते जनता प्रिय राजे ठरले या राजघराण्यातील आतापर्यंत झालेले शुभविवाह बेळगाव कोल्हापूर पुणे मुंबई अशा ठिकाणी झाले होते सावंतवाडीत प्रथमच युवराज लखमराजे यांचा शुभविवाह आयोजित करण्यात आला होता त्यामुळे पाहुण्यांचे आदरतिथ्य आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले काही दिवस सावंतवाडी राजघराण्याच्या कुटुंबीयांनी धावपळ केली .

या धावपळीत सावंतवाडीच्या प्रजेला देखील या शुभ कार्यात सामील करून घेतले या शुभविवाहाला लागणाऱ्या फुलांपासून जेवणापर्यंत व राेषणाई पासून म्युझिक पर्यंत स्थानिकांनाच शुभ कार्यात सामील करून घेण्यात आले राजेशाही थाटात शुभविवाह झाला त्यात स्थानिक सावंतवाडीतील व्यावसायीकांना शुभविवाह सहकार्य करण्याची संधी दिली हे विशेष मानले जाते .

राजे श्रीमंत खेमसावंत भोसले व राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले यांचा चौतीस वर्षांपूर्वी शुभविवाह झाला ताेही मुंबई येथे झाला होता पण युवराज लखमराजे यांचा राजघराण्याच्या इतिहासात प्रथमच सावंतवाडीच्या राजवाड्यात विवाह संपन्न झाला त्यामुळे पाहुण्यांचे आदरतिथ्य करण्याचे नियोजन हे महत्वाचे मानले गेले
सावंतवाडी राजवाडात विद्युतरोषणाईने सजविला गेला होता राजवाड्यात शुभविवाह चा सभामंडप देखील सजविला गेला होता राजवाडा परिसरात देखील पाहुण्यांच्या स्वागतासाठी शोभिवंत फुलांसह नैसर्गिक सौंदर्य निर्माण करण्यात आले होते

युवराज लखमराजे यांच्या शुभविवाहास कोल्हापूर , सातारा , फलटण ,बडोदा,गाेवा अशा देशभरातील विविध राजघराणी राजे आणि त्यांचे कुटुंबीय दाखल झाले हाेते. कोल्हापूरचे शाहू छत्रपती महाराज, युवराज संभाजी छत्रपती ,साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले ,विक्रमराजे भोसले ,सोडुंरचे महाराज अजय घोरपडे , अक्कलकोटचे राजे मालोजीराजे भोसले गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे , माजी केंद्रीय मंत्री ग्वाल्हेरचे कै.माधवराव शिंदिया यांच्या बहीण यशोदाराजे सिंधिया , विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर यांच्या पत्नी साै.रेखाराजे नाईक निंबाळकर, सातार्‍याचे खासदार राजे उदयनराजे यांच्या आत्या काशीपुरच्या अक्षाेभसिंगराजे, कागलचे राजे मेघेद्रंसिंह घाटगे ,श्रीमंत राजमाता घाटगे , युवराज प्रवीणसिंह घाटगे ,बडोद्याचे महाराज समरजीतसिंह गायकवाड ,बडाेद्याच्या राजमाता शुभांगीनीराजे गायकवाड,साै.राधीकाराजे गायकवाड ,जसदनचे दरबारसाहेब सत्यजितराजे खाचर ,गाेवा पेडणेचे देवेंद्र देशप्रभू ,जितेंद्र देशप्रभू कुंटुबिय , धुळ्याचे माजी आमदार राजे राजवर्धन कदम बांडे , गजेंद्रगड चे घाेरेपडे अाणि साै.शुभदेवी याचे माहेरचे माताेश्री मृणालीनी सावंत व उद्याेगपती श्री.अशाेक सावंत व कुटुंबिय ,नेसरीकर शिंदे कुंटुबिय,बंगलाेर चे श्री.नारायणराव माने व कुंटुबिय, नंदीकर सरकार परिवार, माजी आमदार शिवराम दळवी व सावंत- भाेसले, राजघराणे अशी सुमारे २०० व त्यांचे कुटुंबीय या विवाह सोहळ्यास दाखल झाले होते

या शुभ विवाह सोहळ्यास युवराज लखमराजे व साै.श्रध्दा यांना शुभाआशीर्वाद देण्यासाठी आलेल्यांचे स्वागत व आदरातिथ्य राजे श्रीमंत खेमसावंत भोसले ,राणीसाहेब सौ शुभदादेवी भोसले ,राजकुमारी उर्वशीराजे भोसले यांनी केले
सावंतवाडी सारख्या निसर्गसंपन्न शहरात राजवाड्यात झालेल्या या देखण्या शुभविवाह मुळे सावंतवाडी संस्थानचा राजवाडा नटुन गेला आहे.