तांबळडेग येथे २२, २३ मार्च रोजी कासव यात्रेचे आयोजन

512

देवगड,ता.१६

तालुक्यातील तांबळडेग समुद्र किनारी २२ मार्च व २३ मार्च या दोन दिवसांत कासव यात्रा, बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे,या माध्यमातून मनमोहक कासवाची पिल्ले वाळूतून बाहेर येताना सर्वाना पहायला मिळणार आहे, देशातील अनेक पर्यटक या फेस्टिवल मध्ये सहभागी होणार आहेत,आपणही भेट देऊन याचा आनंद लुटावा.असे आवाहन करण्यात आले आहे

२२ मार्च रोजी सकाळी उद्घाटन सोहळा, पतंग महोत्सव व समुद्र किनारी ईतर खेळांचे आयोजन करण्यात आले आहे,मनमोहक वाळूशिल्प, रात्रौ सांस्कृतीक कार्यक्रम तसेच २३ मार्च रोजी समुद्र किनारा सफर, कासवाची माहिती, अंड्यातून कासवाची पिल्ले बाहेर येताना प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहेत याच दरम्यान वॉटर स्पोर्ट्स आनंद लुटता येणार आहे, कोकणातील लोककला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,कोकणी मेवा सह सर्व खाद्यपदार्थ दुकाने उभारण्यात येणार आहेत, या कासव जत्रेला व बीच फेस्टिवला सर्वांनी उपस्थित रहावे असे तांबळडेग ग्रामपंचायत,व ग्रामसेवा संस्था यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधा, सरपंच मालंडकर,९४०४१७१६५८,
कार्यवाहक नाना मोंडकर ९८२०९२३९०९ यांच्याशी संपर्क साधावा.