सावंतवाडी पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी निधीच नाही : पंकज पेडणेकर

393

जमीन मोजणीसाठी सेस फंडातून तरतूद.

सावंतवाडी, ता.१६

पालकमंत्री दिपक केसरकर सावंतवाडीचे आमदार असुनही पंचायत समितिच्या इमारत उभारणीसाठी निधी मीळाला नसल्याचे सभापती पंकज पेडणेकर यांनी म्हटले आहे.जिल्हयात निधी देणारे पालकमंत्री सावंतवाडीला मात्र विसरले चे बाेलले जात आहे.
येथील पंचायत समितीच्या नव्या इमारतीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रस्तावित असला तरी अद्यापपर्यंत एक रुपयाचा निधी सुद्धा या इमारतीसाठी जमा झालेला नाही. असा गौप्यस्फोट सावंतवाडी पंचायत समितीचे सभापती पंकज पेडणेकर यांनी आज येथे केला.
दरम्यान ही इमारत सालईवाडा येथिल जिल्हा परिषद बांधकाम कार्यालयाच्या ठिकाणी व्हावी यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात पैसे भरण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.
पेडणेकर म्हणाले सावंतवाडी पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी तब्बल दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. लवकरात लवकर हे काम पूर्ण केले जाईल असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कडून करण्यात आला होता. मात्र पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी एक रुपयाचा सुद्धा निधी आमच्याकडे आता नाही.
मात्र ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी ही इमारत उभारण्यात येणार आहे. सध्या ती त्याच परिसरात कार्यालय नेण्यात आले आहे. त्या जागेत इमारत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या पाश्वभूमीवर सर्वेक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली २८ हजार रुपयाची रक्कम पंचायत समीती सेस फंडातुन
भुमिअभिलेख खात्याकडे भरणा करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. आवश्यक असलेली निधी प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी पंचायत समिती उभारणीसाठी आपल्याकडे कोणताही निधी नाही असा दावा श्री पेडणेकर यांनी केला आहे.