जनसंपर्क न्यूज – ( १५ एप्रिल ) बहुचर्चित सलमान खानच्या चित्रपटाचे पोस्टर रिलीज आज सलमान खानने सोशल मिडीयावर प्रदर्शित केले. या चित्रपटात अभिनेता सलमान खान, अभिनेत्री कतरिना कैफ, जॅकी श्रॉफ असे कलाकार काम करत आहेत. निर्माता अतुल अग्निहोत्री आहे. ‘भारत’च्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान, कतरिना वाघा-अटारी बॉर्डरच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे आहेत. चित्रपटातील कतरिनाचा लूक हा आतापर्यंतचा वेगळा लूक असल्याचे दिसतय. तिने साडी नेसली असून केस देखील कुरळे आहेत. सलमान आणि कतरिनाचा चित्रपटातील हा फर्स्ट लूक बघूनच त्यांच्या चाहत्यांची उत्सुकतता वाढली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित भारत या चित्रपटात सलमान कतरिना व दिशा पटानी मुख्य भूमिकेत आहेत. सुरुवातीला या चित्रपटात कतरिनाच्या जागी प्रियंका चोप्राची वर्णी लागली होती. मात्र प्रियंकाने शूटींग सुरू व्हायच्या काही दिवस आधीच चित्रपटातून माघार घेतली होती.
सलमान खानच्या भारत चित्रपटाचे पोस्टर रिलीज
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.







































