जामरूंग ते ठाकूरवाडी दरम्यान मालगाडीचे 6 डबे घसरले

439

जनसंपर्क न्यूज – (खंडाळा प्रतिनिधी ) – खंडाळा येथील जामरूंग ते ठाकूरवाडी दरम्यान मालगाडीचे 6 डबे घसरल्याने डाऊन मेन लाईन पूर्णपणे प्रभावित झाली आहे सध्या मिडल लाईन वरचा अडथळा दूर करण्यात आला असून मिडल लाईन रेल्वे प्रशासनाकडून क्लिअर करण्यात आली आहे या संदर्भात रेल्वेचे टेस्टिंग घेण्यात आले आहे परंतु मिडल लाईनवरून अद्याप रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आलेली नाही या घटनेमुळे मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या चे मार्ग वळवण्यात आले आहे.