जनसंपर्क न्यूज – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सूचनेनुसार आगामी विधानसभा २०१९ निवडणूकीसाठी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे दिनांक १ जुलै २०१९ पर्यंत उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात जमा करावेत असे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले होते. शहरातील २०५ चिंचवड विधानसभा, २०६ पिंपरी विधानसभा, २०७ भोसरी विधानसभा, मतदार संघातील खालील इच्छूक पदाधिकारी यांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
२०५ चिंचवड विधानसभा
श्री. राजेंद्र गणपत जगताप, श्री. विशाल शंकर वाकडकर, श्री. भाऊसाहेब रामभाऊ भोईर, श्री. मोरेश्वर महादू भोंडवे, श्री. मयुर पांडुरंग कलाटे, श्री. विठ्ठल (नाना) कृष्णाजी काटे, श्री. प्रशांत कृष्णराव शितोळे.
२०६ पिंपरी विधानसभा
श्री. ॲड. गोरक्ष जाकाराम लोखंडे, सौ. सुलक्षणा शिलवंत-धर, श्री. राजू विश्वनाथ बनसोडे, श्री. संदीपान रामा झोंबाडे, श्री. शेखर अशोक ओव्हाळ, सौ. सुनंदा सतिश काटे, सौ. गंगाताई संजय धेंडे, श्री. आण्णा दादू बनसोडे.
२०७ भोसरी विधानसभा
श्री. दत्तात्रय कोंडिबा जगताप, श्री. दत्तात्रय(काका) बाबुराव साने, श्री. पंडीत रामभाऊ गवळी.
चिंचवड विधानसभेतून एकूण सात तसेच पिंपरी विधानसभेतून आठ तर भोसरी विधानसभेतून तीन असे तिनही विधानसभा मतदार संघातून एकूण अठरा उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे सादर झाले आहेत, असे पक्ष प्रवक्ते फजल शेख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहिर केले.











































