झोपडपट्टी वासियांना मिळणार हक्काचं घर – सदानंद शेट्टी

791

२९ ऑगस्ट रोजी सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते ‘घर पाहणी सोहळा’

जनसंपर्क न्यूज – महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रतिनिधी व मा.नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी अथक प्रयत्न करून २९ वर्ष झोपडपट्टी वास्तव करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचं घर देण्याचं स्वप्न पाहिलं होत ते स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. सदानंदी गृह फेज दोनमध्ये लवकरच या नागरिकांना त्यांच्या हक्काच घर मिळणार आहे.

२९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घर पाहणी सोहळा होणार असून यावेळी अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांच्या मुख्य उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार असून यावेळी मा. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गटनेते विधिमंडळ शरद रणपिसे, मा. आमदार मोहन जोशी, पुणे आयुक्त सौरभ राव, मुख्य कार्यकारी अधिकारी झो.पु. प्रा. राजेंद्र निंबाळकर, रमेश बागवे, अभय छाचेड, बाळसाहेब शिवरकर, सुजाता शेट्टी, अरविंद शिंदे, भगवान वैराट असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सदानंद शेट्टी यांनी मंगळवार पेठ या ठिकाणी सदाआनंद नगरचा  ११ नोव्हेबर २०११ रोजी पाया रोवला. तब्बल दोन एकरावर विस्तारलेल्या ११ मजली इमारतीमध्ये ६२१ पैकी दिनांक ११ ऑगस्ट रोजी  ४४२ कुटुंब राहण्यासाठी आली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १७९ निवासी आणि व्यापारी गाळे लवकरच लोकापर्ण करणार आहेत. असे मा. नगरसेवक सदानंद शेट्टी व विद्यमान नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी माहिती दिली.