Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जनसंपर्क न्यूज – सांम्बो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने ‘सांम्बो राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेचे आयोजन बाबुराव सणस मैदान, स्वारगेट, पुणे येथे नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील २०० खेळाडू सहभाग घेतला होता. सांम्बो हा खेळ रेसलिंग आणि जुडो यांचे मिश्रण असून यात ९८ टक्के मार्शल आर्ट तर २ टक्के रेसलिंग असते.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हा सांगली जिल्ह्याने पटकवला तर द्वितीय ठाणे तर तृतीय पुणे जिल्ह्याने पटकावला. यामध्ये स्पर्धकांना बक्षीस स्वरूपात गोल्ड, सिल्वर, ट्रॉफी, आणि सर्टिफिकेट असे देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र स्टेट सांम्बोचे सरचिटणीस राम शर्मा, राजेंद्र पवार, अनुप नाईक या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला.
Download WordPress Themes Nulled and plugins.















































