जनसंपर्क न्यूज – आगामी प्रदर्शित होणाऱ्या ‘सेक्शन ३७५’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता अक्षय खन्ना यांना येत्या ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत आर. एच नथानी कोर्टाने शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी हजर राहण्यास सांगितले आहे.
पुण्यातील नामवंत वकील वाजेद खान बीडकर यांनी या चित्रपटाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की ‘सेक्शन ३७५’ या चित्रपटात रेप केस बाबत चुकेचे चित्रीकरण, वकीलांचा अपमान या चित्रपटात दाखवला आहे.
‘सेक्शन ३७५’ हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असून या चिञपटाच्या विरुद्ध वकील वाजेद खान बीडकर यांनी पुणे येथील आर एच नथानी दीवानी न्यायालयात केस दाखल केली. रेप केस बाबत चुकेचे चिञीकरण वकीलांचा अपमान केले प्रकरणी गंभीर दखल घेत कोर्टाने सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय खन्ना व चित्रपट निर्माते यांना हजर राहणे आदेश दिले आहेत.











































