पूर्व भागातील मध्यमवर्गीय नागरिकांचे आय. सी. यु. चे स्वप्न साकार

801

जनसंपर्क न्यूज – पुणे :- मंगळवार पेठेतील प्रभाग क्रमांक १६ क मध्ये पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये लवकरच आय. सी. यु सुविधा सुरू होणार असल्याची माहिती नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली. पुण्यातील मंगळवार पेठ हा परिसर मध्यवर्गीयांचा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अनेक नागरिकांना आरोग्यसाठी कमला नेहरु रुग्णालय सोयीचे व खिशाला परवडणारे असल्याने अनेक नागरिकांना याचा लाभ मिळत आहे पण या
ठिकाणी आय सी यु नसल्याने नागरिकांना या सेवेसाठी अन्य रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. मात्र आता नागरिकांना कमला नेहरू रुग्णालयामध्ये आय. सी. यु सेवेचा लाभ नागरिकांना लवकरच घेता येणार असून ही सेवा इतर रुग्णालयाच्या मानाने नागरिकांच्या खिशाला परवडणारी असणार आहे. असे सुजाता शेट्टी यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे पी. पी . पी . तत्वावर पुणे मनपा संयुक्त विदयमाने आय . सी . यु . विभाग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागास प्रस्ताव दिला त्यानंतर कमला नेहरू रूग्णालय येथे सुरू होणाऱ्या आय . सी . यु . विभागाला स्व .पदमावती कृष्णा शेट्टी यांचे नाव देण्यात यावे याकरीता ठराव दिला त्यानंतर या नावाला समिती व मुख्य सभेने ठरावास मान्यता दिली सुजाता सदानंद शेटटी यांनी वर्गीकरणाव्दारे रक्कम रूपये ८२ लाख इतकी आर्थिक तरतूद उपलब्ध करून दिली व आरोग्य खात्याने रक्कम रुपये १० लाख इतकी आर्थिक उपलब्ध करून दिली . असे एकुण ९२ लाख इतकी आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली. २०१९ लोकसभेची आचारसंहिता लागू झाल्यामुळे टेंडरची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही . २०१९ लोकसभेची आचारसहिंता मार्च अखेर पर्वत असल्यामुळे वर्गीकरणाव्दारे उपलब्ध करुन देण्यात आलेली आर्थिक तरतूद लॅप्स झाली . आचारसंहिता संपल्यानंतर सुजाता शेटटी यांनी पाठपुरावा करून खात्याकडे उपलब्ध असलेल्या निधीतून उपकरणे खरेदी करण्यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली . ७ उपकरण खरेदी करण्यासाठी कमी पडणारी आर्थिक तरतूद रक्कम रूपये १ कोटी ३० लाख उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सुजाता शेट्टी यांनी दिले .

” रक्कम १ कोटी ३० लाख पैकी ९|९|१९ रोजी ५० लाख रूपये तरतुद उपलब्ध करून दिली.
कमला नेहरू रुग्णालय येथे आय . सी . यु , विभाग प्रकल्प कार्यान्वित होण्याकरीता मा. स्थायी समिती अध्यक्ष सदानंद कृष्णा शेटटी व कार्यक्षम नगरसेविका सी . सुजाता शेटटी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला . कमला नेहरू रूग्णालय येथे पहिल्या मजल्यावरील अंदाजे क्षेत्रफळ ३९७ . ३९ चौ . मी . जागेमध्ये आय . सी . यू . विभाग सुरू करण्याकरीता पात्र संस्थेस कमला नेहरू रूग्णालय येथील उपलब्ध असलेले ९ उपकरणे देण्यात येणार असून सन २०१८ – १९ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून आणखी दहा उपकरणे आय . सी . य . विभागाकरीता पात्र संस्थेस उपलब्ध करून देण्यात आहे . तसेच सन २०१९ – २० मध्ये २० आय . सी . य . विभागाकरीता आवश्यक असणारे उर्वरीत उपकरणे निविदा प्रक्रियाव्दारे खरेदी करून पात्र संस्थेस उपलब्ध करून देण्यात येणार आहे . कमला नेहरू रुग्णालय येथे अतिदक्षता विभाग पी . पी . पी . तत्वावर पुणे मनपा संयुक्त विदयमाने डॉ. सम्स मेडिकल कन्स्लन्टसी यांना ३० वर्षाच्या मुदतीकरीता चालविण्यास देणे कामीच्या प्रस्तावास दिनांका १६ / ९ / २०१९ रोजी मा . स्थायी समितीची मान्यता मिळालेली आहे .

सुजाता शेट्टी म्हणाल्या या समाज हिताच्या कामासाठी आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, बिपीन शर्मा, आरोग्य प्रमुख्य रामचंद्र हंकारे, अंजली साबणे, संजोग वावरे, ढोकिलकर, गटनेते अरविंद शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष मा. सुनिल कांबळे, नाव समितीचे सर्व पदाधिकारी व सभागृहातील सर्व सभासद यांचे विशेष सहकार्य लाभले.