सदानंद शेट्टी यांचे भावनिक पत्र आमदारकीचे तिकीट न मिळाले व्यक्त केली खंत

452

काँग्रेस पक्षाने केली नेहमीच निष्ठेची विष्ठा ! तीन वेळा पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे व एकदा निवडून येणारे , त्यानंतर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात उडी घेऊन दोन वेळा निवडणूक लढवून मंत्री असताना २०१४ ला पराभूत झालेले उमेदवार श्री . बागवे यांना परत तिकीट . . . सन २०१४ ला मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली असता , ते विद्यमान आमदार असल्याने त्यांना डावलता येत नाही हे कारण सांगून मला डावलले . मी पक्षाचे ऐकलेही व त्यांचे प्रामाणिकपणे कामही केले ; पण ते पराभूत झाले . त्यानंतर पक्षाने त्यांना शहर काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषविण्याची संधी दिली आणि आता परत २०१९ ला तिकिटाच्या स्पर्धेत आम्ही दोघेही असताना पुन्हा ते शहराध्यक्ष आहेत म्हणून प्राधान्याने त्यांना संधी दिली व पुन्हा मला डावलले . मला खऱ्या अर्थाने या मतदारसंघात झोपडपट्टीवासियांचा प्रश्न बिकट असून मध्यमवर्गीय व गोरगरीब वस्तीही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची व या मतदारसंघात अनेक विकासकामे प्रलंबित असल्याने व ते करायची असल्याने श्रेष्ठींना आवर्जून सांगण्यात मी कुठेही कमी पडलो नाही व तसे , श्रेष्ठींचे मला तिकीट देण्याची मानसिकताही तयार झाली होती पण काही एक – दोन श्रेष्ठी हे माझ्या महानगरपालिका निवडणुकीच्या तिकिटापासून ते आतापर्यंत माझं सामाजिक व राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचा विडाच उचलला होता , असे वाटते . त्यामुळे माझ्यावर प्रत्येक वेळी घोर । अन्याय केला गेला . पक्षश्रेष्ठीनी दोन्ही उमेदवारांना एकत्र बसवून चर्चा करून निर्णय घेतला असता तर काही तरी निष्कर्ष निघाला असता . पण माझे राजकीय जीवन संपविण्याचे ठरले असेल तर ? व दिल्लीच्या श्रेष्ठीना खोटे – नाटे सांगून आपले उमेदवाराचे तिकीट बसविण्यात यशस्वी झाले तसेच पक्षश्रेष्ठी त्यांना निवडून आणण्यातही यशस्वी होतील . पण माझ्यासारख्या एकनिष्ठ सर्वसामान्य कार्यकर्त्याची काय गरज ! महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेला , काँग्रेस व म . न . से . सदस्य संख्या २८ – २८ होती . विरोधी पक्षनेतेपद कोणाला ? तेंव्हा माझी गरज त्यांना वाटली आणि त्या पोटनिवडणुकीत मी काँग्रेसचा उमेदवार सर्व ताकदीनिशी निवडून आणला व विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला मिळाले . याची विसर पडलेली दिसतेय . तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढणार , ते मी आजवर केलेल्या जनहिताच्या कामांच्या जोरावर निवडून येत असल्यास लढवेन . अन्यथा पक्षाचा उमेदवार पराभूत व्हावा हा माझा हेतू नक्कीच नाही . यांचा आणि माझा कुठलाही वाद नाही . पण माझ्यावर वारंवार अन्याय झाला हे नक्की आहे . त्याचे निरसन झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही . वेळप्रसंगी मी पक्षाचा व प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , वरिष्ठ उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटी या पदांचा राजीनामाही देईल . नाही तिकीट तर नाही . ज्या लोकांची आजवर सेवा केली ती तशीच यापुढे देखील करत राहील . माझ्या रक्तामध्येच कार्य आहे . पण पक्ष श्रेष्ठीची नियत कळली . पक्ष नाही तर झोपडपट्टी संघटनमार्फत मी समाजकार्य करत राहील . पण माझ्याबरोबर मीच राहील . कुठल्याही माझ्या प्रिय कार्यकर्त्याला पक्ष सोडण्यासाठी व पक्षाचे काम न करण्यासाठी दबाव टाकणार नाही किंवा माझी पत्नी सध्या कार्यक्षम नगरसेविका असून त्यांनाही मी पक्षकार्यापासून वंचित ठेवणार नाही हे आपणांस प्रचारात दिसेलच पण माझ्यावर अन्याय झाला . त्याचं निरसन जोपर्यंत होत नाही , तोपर्यंत माझी भूमिका तटस्थ राहील . आजवर जितक्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर काम केले . त्यांची मी आमदार होण्याची इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही , त्याबाबत मी दिलगीर आहे . आपलाच सदानंद कृष्णा शेट्टी