जनसंपर्क न्यूज – सेव्ह द एनवायरनमेंट फाउंडेशनच्या वतीने पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर पर्यावरण व अॅमेझॉन जंगलाला वाचण्यासाठी पदयात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या पदयात्रेत जगभरातील तसेच भारतातील जंगले वाचा, झाडे तोड करू नका, झाडे लावा झाडे जगवा, पृथ्वी वाचवा असे फलक दर्शवून व घोषणा देवून जनजागृती केली. यावेळी सेव्ह द एन्व्हायर्नमेंट फाऊंडेशनचे संस्थापक ललित ओसवाल, लीना जैन, मोहन शिंदे सरकार , हेमंत धामुनासे, मेंम्बर्स शीतल दानवळे, श्री मुकेश गायकवाड, रोहित बोराना संजय सावंत, त्रिशला राणे, आदी मान्यवरांनी यात सहभाग घेतला होता.
यावेळी बोलताना फाऊंडेशन तर्फे असे सांगण्यात आले कि जंगलाला मुद्दाम लावल्या जाणाऱ्या आगी, बेकायदा वृक्षतोड यासारख्या समस्या, वनतोडीसाठी परवानग्या, बेछूट वृक्षतोड, वनांच्या सीमेवर राहणाऱ्या गावातील गावकरी वन जमीनीवर शेती करण्यासाठी वनांना आगी लावतात. त्याकडेही दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे सध्या पृथ्वी आपली धोक्यात आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालला असून पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आली आहे. याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. जगाचं फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉनच्या जंगलांना काही दिवसांपूर्वी भीषण आग लागली होती. इतकी भीषण होती की वणव्यामधून निघणारा धूर अंतराळातूनही दिसत होता. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार वायव्येतील या जंगलांमध्ये लागल्याने आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यांपासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या ब्राझीलमधील रिओ दी जनेइरोपर्यंत धूर पसरला होता.
ते पुढे म्हणाले की अॅमेझॉन हे जगातील सर्वात मोठे पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलांमध्ये वर्षातील १२ महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमीनीपर्यंत पोहचत नाहीत. जगभरातील वनस्पतींपासून तयार होणाऱ्या एकूण ऑक्सिनपैकी २० टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून निर्माण होतो. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता या जंगलांच्या अस्तित्वालाच या भीषण वणव्यामुळे धोका निर्माण झाला होता. जंगलामधील अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याचे अनेक हृदद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
पर्यावर व जीवसृष्टी वाचण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलला आहे आपण सर्वांनी यात सहभाग घ्यावा असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.











































