सुनील कांबळेंसाठी मंगळवार पेठेत सदानंद शेट्टी यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
जनसंपर्क न्यूज – नुकातच भाजपमध्ये प्रवेश केलेले पुणे शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष तसेच माजी नगरसेवक सदानंद शेट्टी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघ पिंजून काढायला सुरवात केली आहे. भाजपसाठी पुणे कॅन्टोन्मेंटचा विजयरथ खेचून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून मंगळवार पेठेत सुनील कांबळे यांच्यासाठी नुकतेच पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत सदानंद शेट्टी यांनी सहभाग घेतल्याने मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता. यावेळी मा. नगरसेवक गणेश बीडकर, मा.स्थायी समिती अध्यक्ष सदांनद शेट्टी, नगरसेविका पल्लवी जावळे अशा अनेक मातबगर यावेळी उपस्थित होते.

सदानंद शेट्टी यांचे मंगळवार पेठेतील व परिसरातील सामाजिक कार्य वाकण्याजोगे आहे. त्यांनी उभा केलेला एस. आर. ये प्रोजेट, निकाली काढलेला पाण्याचा प्रश्न, या भागातील मूलभूत प्रश्न मार्गी लावले असून त्यांनी त्यांच्या राजकीय असलेल्या ३७ वर्षाच्या कारकिर्दीत केलेले कामे याच्यामुळे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना फायदा होईल.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सदानंद शेट्टी म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मा. खासदार संजय नाना काकडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच गणेश बीडकर यांच्या साथीने मी मोठ्या ताकतीने भाजपसाठी काम करणार असून पुणे कॅन्टोन्मेंटचा विजयरथ खेचून आणणार आहे. माझे मित्र कॅन्टोन्मेंट मतदार संघामध्ये भाजप शिवसेना युतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना भरघोस मत मिळवून देण्यासाठी माझे विशेष प्रयत्न राहतील.














































