देगलूरचे सुपुत्र गणेश हणमन्लू चप्पलार यांचा सेट परीक्षेत झेंडा

1036

जनसंपर्क न्यूज – महाराष्ट्र आणि गोवा राज्यात जूनमध्ये झालेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकतेच लागला आहे. या परीक्षेत देगलूरचे सुपुत्र गणेश हणमन्लू चप्पलार यांनी पत्रकारिता व जन संज्ञापण (जर्नालिजम & मास कम्युनिकेशन) या विषयात ते उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी पुणे येथे झाले. सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे  ही परीक्षा 23 जून 2019 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. पत्रकारिता संज्ञापण या विषयात उच्च शिक्षण तसेच सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी ही उत्तीर्ण होणे आवश्यक असते. यंदा फक्त 6.87 % निकाल लागले आहे. गणेश चप्पलवार यांनी पत्रकारितेचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापण व वृत्तपत्रविद्या या विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्यात गेल्या दोन वर्षांपासून अध्यापन क्षेत्रात कार्य करतात. सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याने कुंटूब, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छाचे वर्षाव होत आहे.