जनसंपर्क न्यूज – पुण्यातील मंगळवार पेठ येतील सदानंद नगरमध्ये ‘रजनीगंधा’ या मराठी आणि हिंदी गीतांच्या मैफिलीची आयोजन नुकतेच करण्यात आले होते. यावेळी रोते हुवे आते है सब, मेरे सपनो कि, ये जो मोहबत हे, निसर्गराजा एक सांगतो, गोमू संगतीने, केव्हा तरी पहाटे अशी एक से बढकर एक अशा गीतांचा नजराणा रसिकांसाठी ठेवण्यात आला होता. निमित्त होत ते म्हणजे दीपावली फराळ आणि दीपावली शुभेच्छा याचे.या कार्यक्रमाचे संयोजन माजी स्थायी समिती अध्यक्ष सदानंद शेट्टी यांनी केले होते.
सदानंद नगरच्या व परिसरातील रसिकांनी या मैफिलीचा आनंद घेतला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर व आमदार मुक्ता टिळक , आमदार सुनील कांबळे, माजी नगरसेवक सुधीर जानजोत याच बरोबर विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदारपदी निवडून आलेल्या मुक्ता टिळक व सुनील कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी कांबळे म्हणाले की, कँटोन्मेंटमध्ये मला निवडून आणण्यात सदानंद शेट्टी व शेट्टी मित्रपरिवार व सदाआनंद मधील नागरिकांच्या सिंहाचा वाटा आहे.
दिवाळीचे औचित्य साधून सदानंद शेट्टी यांनी नागरिकांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार मुक्ता टिळक, आमदार सुनील कांबळे, नगरसेविका सुजाता शेट्टी, साक्षात शेट्टी, सिद्धांत शेट्टी असे अनेक मान्यवर उपस्थित होते.













































