स्वराज्य (जाणीव) सामाजिक संस्थेकडून मदतीचे आवाहन

339

जनसंपर्क न्यूज – ( २९ एप्रिल – कल्याण – मुंबई  ) कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हातावर पोट असलेल्या, आपल्या पोटाची खळगी भरु शकत नाहीत, अशा गरीब व गरजू व्यक्तींना अन्नधान्याची मदत केली जात आहे. आणि या उपक्रमाला जागोजागी फारच छान असा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

तेव्हा इतरांप्रमाणेच आपण देखिल स्वराज्य (जाणीव) सामाजिक संस्थेतर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणुन छोटासा का होई ना पण एक खारीचा वाटा या स्वरूपात आर्थिक व धान्य स्वरुपात मदत करण्याचे योजिले आहे.
जेणेकरून जाणिव सामाजिक संस्थेच्या या कार्याला आपला देखील हातभार लाभेल. आणि या कार्याला अजून काही गरजू लोकांपर्यंत पोहोचविता येईल.

आर्थिक स्वरुपात किंवा धान्य स्वरुपात या उपक्रमास मदत पुरविण्याकरीता गूगल पे अथवा फोन पे मार्फत या 8424009555 दिलेल्या क्रमांकावर किमान *१/-* इतकी रक्कम जमा करावी. असे आवाहन अनित‍ा पाटिल कल्याण शहर महिला उपाध्यक्षा जाणिव सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.