आमिर खानच्या असिस्टन्टचा हार्टअटॅकने मृत्यू

414

जनसंपर्क न्यूज – मुंबई – अमीर खानचे असिस्टंट गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्या सोबत काम करत होते. काही काळ अमोस यांनी अभिनेत्री राणी मूखर्जी यांच्या सोबत ही काम केले होते. हृदयविकाराच्या झटक्याने अमोस पॉल यांचं निधन झालं असून, गेली दोन दशकं ते आमिर खानसोबत काम करत होते. आमिरचा जवळचा मित्र करीम हाजीनेही सोशल मीडियावर अमोस यांच्या निधनावर दुःख व्यक्त केलं. या पोस्टमध्ये करीमने लिहिले की, ‘दोन दशकं आमिरची सावली म्हणून काम करणारे अमोस पॉल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. अमोस यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.