एम. आय. जी.च्या अध्यक्षपदी कीर्ती लखोटिया व जितेंद्र लखोटिया यांची निवड

245
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी –  महेश इंडस्ट्रियल ग्रुप (एम. आय. जी) एन. जी. ओ च्या यंदाची कार्यकारणी जाहीर झाली असून अध्यक्षपदी कीर्ती लखोटिया व जितेंद्र लखोटिया, उपाध्यक्ष म्हणून आरती भुतडा व श्याम भुतडा, सचिव – अनुराधा इंदानी व कोहिनूर इंदानी, कोषाध्यक्ष – नीलम सारडा व सागर सारडा, संचालक रितू राठी व प्रदीप राठी, संचालक पूनम राठी व सागर राठी, संचालक सरिता धूत आणि उमेश धूत, संचालक निधी करवा व आदित्य करवा यांची निवड बहुमताने करण्यात आली आहे.

महेश इंडस्ट्रियल ग्रुप (एम. आय. जी) एन. जी. ओ स्थापना १९७७ रोजी झाली असून तेव्हा पासून सक्रिय आहे. माहेश्वरी समाजातील नवीन उद्योजकांना सामाजिक, आर्थिक, औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी आणि सक्षम करण्यासाठी कार्य करते. अशी माहिती एम. आय. जी चे माजी अध्यक्ष मनोज बेहेडे यांनी दिली आहे.