जीवनात ध्यानाचे झाड कसे लावायचे” कार्यक्रमाचे आयोजन

245

जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – “जीवनात ध्यानाचे झाड कसे लावायचे” त्याचबरोबर “मेरा उत्थान मुक्ती महोत्सवाचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.०० वाजता मनन आश्रम, सिंहगड रोड येथे आयोजन करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रख्यात वक्ते सरश्री हे समस्येचे निराकरण, ज्ञानाचे फळ – एक उपाय ध्यान’ अशा बाबींवर मार्गदर्शन करणार आहेत. सदरील कार्यक्रम सर्वांसाठी खुला आणि पूर्णपणे विनामूल्य आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निसर्ग हा आविष्कारांनी भरलेला आहे. हे आपल्या सर्वांना माहीत आहे.  या प्रत्येक नजरेत कितीतरी चमत्कार लपलेले आहेत!  मानवाला निसर्गाशी योग्य समन्वय राखता आला, तर निसर्ग आपल्याला रोज आनंदी राहण्याची असंख्य कारणे आणि आठवणी देऊ शकतो.  जरा तुमच्या आजूबाजूच्या सदाहरित फुलझाडांकडे बघा, ती देखील आपल्याला प्रत्येक परिस्थितीत फुलून आणि आनंदी राहायला शिकवत आहेत.

पण मनाला प्रसंगात अडकायची सवय असते! मग असे काय घडू शकते जे आपल्याला प्रत्येक घटनेपासून त्वरित दूर करते आणि आपण आपल्या आनंदाकडे वळतो?  ती म्हणजे ‘ध्यान’ करण्याची सवय. हे सविस्तर जाणून घेण्यासाठी आणि प्रख्यात वक्ते सरश्री यांना ऐकण्याची सर्वांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.