{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

जनसंपर्क न्यूज – चिंचवड प्रतिनिधी – दिनांक : १२ : चिंचवड मतदार संघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांची प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहचली असून कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यावर भाऊसाहेब भोईर यांनी जोर दिला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांचा वाकडमध्ये प्रचार दौरा संपन्न झाला. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेवून संवाद साधला. यावेळी वाकड मधील लोकांनी भोईर यांचे जंगी स्वागत केले. भाऊसाहेबांसारख्या सुशिक्षित आमदाराची चिंचवडला गरज असल्याच्या भावना लोकांनीं व्यक्त केल्या. नागरीकांच्या मनातील आमदार निवडून देण्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन भाऊसाहेब भोईर यांनी मतदारांना केले.

मतदारांना आवाहन करीत असतांनाच भेटी दरम्यान अनेक विविध गोष्टींवर नागरिकांशी संवाद साधला. नागरिक उत्साहाने संवाद बैठकीत सहभागी होऊन मन मोकळे करीत होते. या भागातील सोसायट्यांचे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी  भाऊसाहेब प्रयत्न करतील त्यासाठी चिंचवड मध्ये आपल्याला बदल हवा आहे आणि त्यासाठीच एक मताने एक दिलाने अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहोत अशा भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.

भोईर म्हणाले की ” मला मतदारांचा उत्स्पूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांना एकच आवाहन करेन की आपण उमेदवाराची पार्श्वभूमी पाहून अमूल्य असे मतदान करावे. नागरिकांच्या न्यायासाठी व हक्कासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन.

आज वाकडगाव परिसरात झालेल्या गाठी भेटीत आत्माराम कलाटे – वाकड , वेस्टन एवेन्यू सोसायटी –  वाकड , राजाभाऊ विनोदे – हिंजवडी , भरत आल्हाट – विनोदे वस्ती , विष्णू कस्पटे – वाकड , मयूर जाधव – वाकड , ज्येष्ठ नागरिक संघ – रहाटणी , श्याम जगताप – पिंपळे गुरव , तानाजी जवळकर –  पिंपळे गुरव , खंडू कोकने – पिंपळे सौदागर , डॉ कपिल साओजी -पेंटागोन हॉस्पिटल आदी मान्यवर उपस्थित होते.