हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; ४८ तासांच्या आत गुन्हे दाखल करण्याचे सक्त आदेश
जनसंपर्क न्यूज – मुंबई : प्रतिनिधी – गाडीचा हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून हल्ला करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पुणे पोलिसांना उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध ४८ तासांच्या आत गुन्हे दाखल करा, असे सक्त आदेश पुण्यातील खडक पोलिसांना दिले आहेत. तक्रारदाराने वारंवार विनंती केल्यानंतरही पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत. यावरूनही न्यायालयाने ताशेरे ओढले.
पुण्यातील शोहेब सय्यदने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकाकत्यनि पोलिसांच्या बेफिकिरीकडे लक्ष वेधले. पुण्यातील सार्वजनिक रस्त्यावर हॉर्न वाजवण्यावरून झालेल्या वादातून हल्ल्याची घटना घडली होती. याचिकाकर्ता शोहेब सय्यद व त्याच्या भावावर हर्ष केशवानी, त्याचे नातेवाईक करण, भरत व गिरीश केशवानी यांच्यासह अज्ञात साथीदारांनी हल्ला केला. त्याचबरोबर धार्मिक शिवीगाळ केली. हल्ल्यात गंभीर दुखापत झाली. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यात गांभीर्य दाखवले नाही, याचिकाकर्त्याने केला. असा दावा
कोर्टान आपल्या आदेशात पुणे पोलिस आयुक्तांना कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे आणि खडक पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस बजावून विलंबाचे स्पष्टीकरण मागण्याचे निर्देश दिले. जर स्पष्टीकरण योग्य नसेल, तर पोलिस आयुक्त सेवा न्यायशास्त्र नियमांनुसार अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करतील, असे खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.











































