(काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी)
जनसंपर्क न्यूज – काळेवाडी प्रतिनिधी – श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हयांना प्रतिबंध करण्याबाबत सुचना दिल्याने त्या अनुषंगाने श्री. राजेंद्र बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या तपास पथकाकील सहा. पोलीस निरीक्षक श्री. वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्री. नागनाथ सुर्यवंशी व तपास पथकातील अंमलदार यांना रेकॉर्डवरील वाहनचोरी करणा-या गुन्हेगारांवर लक्ष ठेवुन त्यांना चेक करुन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या.
त्या अनुषंगाने काळेवाडी पोलीस स्टेशन तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्री. वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्री. नागनाथ सुर्यवंशी, श्रेणी पो. उपनि.श्री राजेंद्र काळे, पोहवा/१३६६ स्वप्निल खेतले. पोहवा/१११८ प्रमोद कदम, पोहवा /१२२३ अतिक शेख, पोशि/२१६७ अजय अरुण फल्ले, पोशि/२९७५ रमेश खेडकर, पोशि/३१५९ गणेश जाधव असे काळेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करत असताना पोहवा/१११८ प्रमोद कदम यांना बातमी मिळाली कि, पाचपीर चौक काळेवाडी येथे राहणारा एक इसम हा एक पल्सर मोटार सायकल वापरत असुन तो संशयीत वाटत आहे. येणे प्रमाणे बातमी मिळाल्याने बातमीदाराचे मार्फतीने त्याचा काळेवाडी परिसरामध्ये शोध घेत असताना तो पाचपीर चौकात राहत असल्याचे खात्रीशिर माहीती मिळाल्याने आम्ही पाचपीर चौकामध्ये सापळा लावुन थांबलो. काही वेळामध्ये लाल रंगाचे पल्सर मोटार सायकल वरुन एक व्यक्ती असल्याचे दिसले आम्ही त्यास शिताफीने पकडले. त्याचेकडे असलेल्या गाडीचा नंबर पाहिला असता तो यु.पी.७०/डी.एन./८१६३ असा होता. नमुद व्यक्तीस त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव-शुभम चंद्रकांत शिंदे वय-२६ वर्षे रा. पाचपीर चौक, नब्रेनगर काळेवाडी पुणे मुळ रा.फौजी आंबवडे, ता. महाड, जि. रायगड असे असल्याचे सांगितले. तो वापरत असलेली पल्सर मोटार सायकल व मोटार सायकलबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने नमुद गाडी त्याने त्याचे मित्राकडून विकत घेतल्याचे सांगितले. आम्ही नमुद व्यक्तीस गाडीसह पोलीस स्टेशन येथे आणले व त्याचेकडे सखोल तपास केला असता त्याने नमुद पल्सर मोटार सायकल त्याचा मित्र गुन्हयातील अटक आरोपी नामे सोमनाथ शांताराम कासरुंग वय-३२ वर्षे, रा.नेन्हे, दत्तवाडी, मारुंजी रोड घाणेकरवस्ती, ता.मुळशी, जि.पुणे मुळ रा. करंजमाळ, ता. महाड, जि. रायगड याचेकडुन विकत घेतल्याचे सांगितले. आरोपी याचे बोलण्यामध्ये व त्याचेकडे तपासामध्ये तो खोटे बोलत असल्याबाबत संशय आल्याने मिळालेल्या पल्सर मोटार सायकलचे चेसी नंबर, इंजिन नंबर वरुन मोटार सायकल मालकाची माहिती प्राप्त केली व काळेवाडी पोलीस स्टेशन कडील मोटार सायकल चोरीचे दाखल गुन्हयाचे माहिती घेतली असता नमुदची गाडी ही काळेवाडी पोलीस स्टेशन गु.रजि.नं.२८२/२०२५ बी.एन.एस.३०३(२) मधील चोरीस गेलेली असल्याचे निष्पण्ण झाले.
नमुद आरोपी यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता आरोपी यांचेकडुन २० मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असुन त्याबाबत खालीलप्रमाणे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपी याचेकडुन तपासा दरम्यान ८,४०,०००/- रु च्या एकुण २० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या असुन त्यापैकी १० दुचाकीबाबत वर नमुद प्रमाणे गुन्हे दाखल असुन उर्वरित १० दुचाकीबाबत तपास चालु आहे.
सदरची कारवाई मा.श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.श्री. शशिकांत महावरकर साो, पोलीस सह आयुक्त, मा.श्री. सारंग आवाड सो, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा.श्री. विशाल गायकवाड सो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०२ पिंपरी चिंचवड, मा.श्री. सुनिल कुऱ्हाडे साो, सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. राजेंद्र बहीरट वरिष्ठ पोलीस निरिक्षक, काळेवाडी पोलीस स्टेशन, श्री. सुरेंद्र धुमाळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), सहा. पोलीस निरीक्षक श्री. वैभव गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्री. नागनाथ सुर्यवंशी, श्री. राजेंद्र काळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार पोहवा/१३६६ स्वप्निल खेतले, पोहवा /१११८ प्रमोद कदम, पोहवा/१०३५ अशोक जायभाये, पोहवा/१२२३ अतिक शेख, पोहवा/८७२ भारत पारधी, पोशि/२१६७ अजय अरुण फल्ले, पोशि/२५०२ भास्कर भारती, पोशि/२९७५ रमेश खेडकर, पोशि/३१५९ गणेश जाधव यांनी मिळून केलेली आहे.











































