वैभववाडी-प्रतिनिधी

तालुक्यातील सडुरे (सोनधरणे) येथील सारीका सत्यवान काळे (वय ३२ वर्षे) या नवविवाहितेने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी सायं. ६. वाजण्याच्या सुमारास घडली. येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तिला पणजी येथे नेत असताना उपचारापूर्वीच बादा दरम्यान मृत्यू झाला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत सारीका काळे हिचे पाच वर्षापूर्वी सत्यवान काळे यांच्याशी लग्न झाले होते. गेली दोन महिने त्या आजारी होत्या. त्यांचे पती येथील विद्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी सकाळी पती, सासरे व सासू कामाला गेली होती. घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत शुक्रवारी सायंकाळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. सायंकाळी पती, सासरे व सासू घरी आल्यानंतर त्यांना जाळून घेतल्याचे समजताच त्यांनी तात्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यात ती गंभीररित्या भाजली असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी पणजी येथे हलविले. मात्र तिचा बांदा येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मयत काळे हिला दोन लहान मुली आहेत.