जनसंपर्क न्यूज – सावंतवाडी ता.१६ (अंबोली )- आंबोली मधे पर्यटन वाढीसाठी जंगल सफारी, नाईट टेंट (अडव्हेंचर), ट्रेकिंग, रिव्हर ट्रेकिंग, साहसी खेळ, नाईट सफर, जंगल भ्रमंती, बॉयोडाव्हर सिटी कॅम्प, कस्टमाइज टूर्स, पॅकेज टूर्स असे नवीन उपक्रम आंबोली टुरिझम टीम तर्फे राबवण्यात येत आहेत.त्याला पर्यटकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
आंबोली मधे ठराविक पर्यटनस्थळे बघण्या पलीकडे काही नाही, असे येथे येणाऱ्या पर्यटकांकडून म्हणणे आहे, राज्यकर्ते आंबोली पर्यटन वाढविण्यास अपयशी ठरले, त्यांना फारसे काही जमले नाही.याचा परिणाम येथील पर्यटनावर झाला, मात्र येथील डोंगर-दऱ्या, जंगल यांना अनुसरून पर्यटनाच्या दृष्टिने फायदा तसेच स्थानिकांना रोजगार निर्माण होण्यासाठी येथील आंबोली टुरिझमचे निर्णय राऊत यांनी नव्या संकल्पना येथे राबवण्यास सुरुवात केली.
फक्त पावसाळ्यातील आंबोली धबधबा ओळखला जात असलेल्या आंबोली येथे जंगल सफारी, रिव्हर ट्रेकिंग, जंगल वॉक / ट्रेक, बर्ड / बटरफ्लॉय वॉचिंग, अनेक प्रकारचे साहाशी खेळ, टेंट कॅम्पिंग, नाईट सफर, ट्रेकिंग, बायोडाव्हर सिटी कॅम्पिंग, एनिमल वॉचिंग, फोटोग्राफी टुर, स्टडी टूर्स, कॅम्पिंग टूर्स, इको व ग्रामीण पर्यटन, कल्चरल टूर्स, कृषी पर्यटन व आदी अनेक असे पर्यटन उपक्रम सुरु केले. याच बरोबर आंबोली पर्यटनासाठी सर्वांसाठी आकर्षक टूर्स पॅकेज बनवून ते वेगवेगळ्या टूर्स व ट्राव्हेल कंपन्यांशी संलग्न केले व अनेक स्तरावर आंबोली पर्यटन चे मार्केटिंग केले, त्यामुळे आता बाराही महीने आंबोलीत पर्यटन होऊ शकते.
यामुळे पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.वेगवेगळ्या कंपन्याशी करार व मार्केटिंग केल्यामुळे पर्यटक येण्यास सुरुवात झाली, यामुळे येथील पर्यटन वाढीसाठी मदत होणार आहे. तसेच “कोकणात येऊन आंबोलीला भेट नाही तर आपली सहल अपुरी” असे ही मार्केटिंग कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी आंबोली टुरिझम कडून केली जाते, सोबत आंबोली सह कोकण व गोवा येथे संयुक्तरित्या पर्यटन केले जात आहे असे श्री.राऊत म्हणाले.
आता त्यामुळे महाविद्यालयीन युवक – युवती, कुटुंबिक, महिला ही अश्या प्रकारच्या वेगळ्या पर्यटनासाठी येथे येतात. त्यामुळे अश्या साहसीक पर्यटनात आंबोलीचा ठसा उमठणार आहे, जिल्हा परिषफ मार्फत ही साहसी प्रकारचे पर्यटन करण्याचे प्रशिक्षण येथील तरुणांना देण्यात आले ,यामुळे येथे बारा ही महीने पर्यटन होण्यास सुरुवात होणार आहे, असे मत आंबोली टुरीझम चे निर्णय राऊत यांनी व्यक्त केले.
आंबोली टुरिझम आता आपल्या विश्वासनीय सेवेमुळे एक ब्रॅण्ड तर झालाच, तर आम्हाला आंबोली टुरिझम द्वारे आंबोली सह तळकोकणातील दुर्लक्षित पर्यटन डिस्कव्हर व एक्सप्लोर करत जास्तीत जास्त पर्यटकांना येथे आणत स्थानिकांना रोजगार मिळावा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आम्ही आंबोली टुरिझम मार्फत आंबोली, कोकण – तळकोकण व गोवा भागातील सर्व प्रकारचे पर्यटन सेवा आम्ही उपलब्ध करुण देतो.यामुळे आंबोली – कोकण व गोवा असे जॉइन पर्यटन करण्याची संधी अनेक पर्यटकांना मिळत आहे. एकीकडे समुद्र किनारे तर दूसरी कड़े जैवविविधतेने भरलेले आंबोली हिल्स स्टेशन असे एकत्रिक रोमांचित पर्यटन करण्याची संधी आम्ही उपलब्ध केल्याने त्याला ही मोठा प्रतिसाद मिळत आहे,असे श्री.राऊत म्हणाले.












































