मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई

507

निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणाऱ्यावर होणार कारवाई

जनसंपर्क न्यूज – सातारा 20 एप्रिल : मतदारांनी मतदान करायला जाताना मोबाईल सोबत घेवून जावू नये ; मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई असून निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणाऱ्यावर कारवाई होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली.

मंगळवार दि. 23 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी गमावू नका. मतदानाचा हक्क्‍ बजावण्यासाठी मतदान केंद्रामध्ये आपले वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) सोबत घेऊन जावे, मतदान ओळखपत्र नसल्यास मतदाराने पासपोर्ट, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे दिले गेलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र, आधारकार्ड यापैकी कोणतेही एक दस्तावेज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करता येणार असून अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा निवडणूक अधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.