Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
- जनसंपर्क न्यूज (२१एप्रिल ) पुणे – निरंकारी सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या असिम कृपाशीर्वादाने मानव एकता दिवसानिमित्त २४ एप्रिल २०१९ बुधवार रोजी सकाळी ८:०० ते ६:०० या वेळेत विशाल रक्तदान शिबीर संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.
निरंकारी जगतामध्ये २४ एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी १९८० साली मिशन चे तिसरे सदगुरु बाबा गुरुबचन सिंह जी महाराज यांनी सत्य, प्रेम, शांती, मानव एकता प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती. तेव्हा अनेकांनी त्यांच्या बलिदानाचा बदला घेण्याची इच्छा प्रगट केली अशा कठीण प्रसंगी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी सर्व अनुयायीना दया, क्षमा, शांती व अहिंसेचा मार्ग दाखवुन आदेश दिला की बलिदानाचा बदला घ्यायचाच असेल तर *माणसाचे रक्त नाल्यामध्ये नाही तर नाड्यामध्ये वाहिले पाहिजे* . तेव्हापासून २४ एप्रिल रोजी मानव एकता दिवसानिमित्त संपूर्ण विश्वामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करून बाबा गुरुबचन सिंहजी आणि अनेक शहीद संतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊ लागली.
आज संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन रक्तदान करणाऱ्यां संस्था मध्ये संपूर्ण जगामध्ये अग्रेसर आहे. संपूर्ण भारत देशामध्ये १९८६ पासून ही शृंखला अविरत चालू असून आजपर्यंत फाऊंडेशन तर्फे दहा लाखाहून अधिक युनिट रक्त मानव मात्राच्या कल्याणासाठी गोर गरीब गरजवंत रुग्णाना दान करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात संत निरंकारी मार्फत वर्ष २०१८-१९ मध्ये एप्रिल ते मार्च २०१९ पर्यंत २२ रक्तदान शिबीरातून ७००७ युनिट रक्त संकलित करण्यात आले होतेे. या कार्यासाठी ससून हॉस्पिटल रक्तपेढीतर्फे सर्वाधिक रक्तदान करणारी संस्था म्हणून संत निरंकारी मिशनचा गौरव देखील करण्यात आला होता. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या वर्षांमध्ये पुणे जिल्ह्याच्या विविध भागामध्ये २८ रक्तदान शिबीर फौंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार आहेत.
रक्तदानाच्या मुख्य दिवशी अधिकाधिक रक्तदात्यांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने गेल्या महिनाभरापासून संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक गंगाधाम, मार्केटयार्ड च्या परिसरात घरा-घरात जाऊन रक्तदानाचे महत्व समजावून सांगत आहेत.
विशाल रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन तर्फे २२ आणि २३ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत पथनाट्य तसेच रॅली चे आयोजन गंगाधाम,मार्केटयार्ड,बिबवेवाडी, काकडे वस्ती परिसरात केले आहे.
संत निरंकारी मंडळाचे पुणे विभाग प्रभारी श्री.ताराचंद करमचंदानी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि आपण ही या रक्तदान शिबिरामध्ये सामील होऊन मानवतेच्या कार्यामध्ये योगदान द्यावे ही नम्र विनंती.
Download WordPress Themes Nulled and plugins.











































